• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे मावळपर्यंत; १७ वा आरोपी निष्पन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर/प्रतिनिधी

राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यापर्यंत पोहोचले असून, या आंतरजिल्हा रॅकेटमध्ये आतापर्यंत एकूण १७ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यापैकी १६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

तपासादरम्यान पुण्यातील मुख्य एजंट आणि संबंधित डॉक्टरांनी आणखी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन वडगाव मावळ येथे विकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मारुती विश्वनाथ ढोरे (वय ४८, रा. वडगाव मावळ) याला आरोपी केले असून, तपासासाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

पोलिसांनी वडगाव मावळ येथून जप्त केलेल्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून मारुती ढोरे हा स्वतः बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी किंवा अधिकृत परवाना नसतानाही तो हा बेकायदेशीर व्यवसाय चालवत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सध्या त्याची शारीरिक स्थिती अटक करण्याजोगी नसल्याने लोणी पोलिसांनी त्याला कायदेशीर नोटीस देत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून, आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

NEET पेपर फुटीचे धागेदोरे अंबाजोगाईत; सीबीआयकडून दोन विद्यार्थ्यांची कसून चौकशी

Next Post

सिंदेवाही तालुक्यात वाघाचा थरार; तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या १३ महिलांवर हल्ला, चौघींचा मृत्यू

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
18
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
9
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
9
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
25
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
23
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post
सिंदेवाही तालुक्यात वाघाचा थरार; तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या १३ महिलांवर हल्ला, चौघींचा मृत्यू

सिंदेवाही तालुक्यात वाघाचा थरार; तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या १३ महिलांवर हल्ला, चौघींचा मृत्यू

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In