• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कस्तुरबा गांधी रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाबाबत संताप; चौकशीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
कस्तुरबा गांधी रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाबाबत संताप; चौकशीची मागणी
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | वर्धा

कस्तुरबा गांधी रुग्णालय येथे डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे एका रुग्णाच्या उपचारप्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

RelatedPosts

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार, बशीर सुलेमान बेग (वय ७४, रा. गोंड मोहल्ला, आंबेडकर गार्डनजवळ, वर्धा) यांना दिनांक २ मे २०२६ रोजी सकाळी उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना मेडिसीन विभाग ३३ मध्ये हलविण्यात आले.

नातेवाईकांच्या आरोपानुसार, संबंधित डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगून पुढील उपचारांसाठी ४७ हजार रुपयांच्या आसपास रक्कम भरण्याचे सांगितले. त्यानुसार कुटुंबीयांनी ४६ हजार ६९६ रुपये भरून रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल केले.

मात्र काही दिवसांनंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी रुग्णाला अन्यत्र हलविण्याबाबत विचारणा केली असता, “उद्या शव घरी घेऊन जाऊ शकता,” असे कथित उत्तर संबंधित डॉक्टरांनी दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी आर्थिक जुळवाजुळव करून रुग्णाला नागपूर येथे पुढील उपचारासाठी हलविले.

या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून डॉ. शुक्ला तसेच डॉ. पुनम वर्मा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालून मेडिसीन विभागातील संबंधित डॉक्टरांविरुद्ध योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

उत्रोलीजवळ दुचाकीवर वीज कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह पत्नीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Related Posts

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

July 7, 2026
13
ताज्या घडामोडी

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

July 7, 2026
106
ताज्या घडामोडी

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

July 7, 2026
5
येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

July 7, 2026
5
ताज्या घडामोडी

भातकुली तालुक्यात ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान कृती समितीची बैठक संपन्न

July 7, 2026
2
ताज्या घडामोडी

सेवापूर्ती निमित्त सहाय्यक शिक्षक देवानंद पाटील यांचा सपत्नीक सत्कार

July 7, 2026
1
Next Post
मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह पत्नीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह पत्नीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

ताज्या बातम्या

भूममध्ये एफडीएची धडक कारवाई; विनापरवाना साठवलेली १,१२५ किलो दूध पावडर जप्त

भूममध्ये एफडीएची धडक कारवाई; विनापरवाना साठवलेली १,१२५ किलो दूध पावडर जप्त

July 7, 2026

तुफान पावसाने अंबरनाथ जलमय; घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल

July 7, 2026

विद्युत पारेषण प्रकल्पास कोडीत खुर्द ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

July 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In