• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भऊर फाटा येथे मेव्हण्याकडून सालीचा चाकूने भोसकून खून; पसार आरोपी ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

देवळा | प्रतिनिधी

देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात कौटुंबिक वादातून मेव्हण्याने सालीचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २२ मे) घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला खामखेडा येथील सरपंच अॅड. वैभव पवार आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

याप्रकरणी मयत महिलेचे पती ज्ञानेश्वर सुरेश जाधव (वय ४१, रा. कॉलेज रोड, अहिल्यादेवी नगर, निफाड) यांनी देवळा पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी छाया ज्ञानेश्वर जाधव यांच्या बहिणीचा विवाह श्याम आगनदास माळी (रा. धोडांबे, ता. चांदवड) याच्यासोबत झाला होता. श्याम माळी हा भऊर फाटा परिसरात मजुरी करत वास्तव्यास होता. दारूच्या व्यसनासाठी पत्नी मायाकडून पैसे मागणे आणि त्यातून होणारे वाद यामुळे कुटुंबात सतत तणाव निर्माण होत होता.

माया हिला होणाऱ्या मारहाणीमुळे ती २१ मे रोजी माहेरी निफाड येथे आली होती. त्यावेळी छाया जाधव यांनी पतीला फोन करून आरोपीने “देवळ्याला या, डायरेक्ट चिरून टाकतो,” अशी धमकी दिल्याचे सांगितले होते.

यानंतर ज्ञानेश्वर जाधव, पत्नी छाया, सासू ताईबाई, साला सोनू कराटे व इतर नातेवाईक शुक्रवारी सकाळी आरोपीची समजूत काढण्यासाठी भऊर फाटा येथे गेले होते. त्यावेळी आरोपी श्याम माळी हा त्याच्या पुतण्यासह मोटारसायकलवर घटनास्थळी आला.

सुरुवातीला बोलणी सुरू असताना आरोपीने अचानक चाकू काढून माया हिला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सोनू कराटे यांनी तिला मागे ओढल्याने वार चुकला. त्यानंतर आरोपीने “तू कायम आमच्या नवरा-बायकोमध्ये येते,” असे म्हणत छाया जाधव यांच्या छातीवर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या छाया जाधव यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भांडण सोडविताना सोनू कराटे यांच्या हातांनाही दुखापत झाली.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांना आरोपी पिळकोस-खामखेडा-सावकी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वैभव पवार यांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर वैभव पवार व ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवत आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

या कारवाईत सोनू शेवाळे, माणिक शेवाळे, सचिन शेवाळे, रोशन शेवाळे, अमोल बिरारी, वकील शेवाळे आणि सौरभ शेवाळे यांनीही मदत केली.

या प्रकरणाचा पुढील तपास सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Tags: Chetan Bagul
Previous Post

राजेंद्र खेडकर यांची रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समिती सदस्यपदी निवड

Next Post

जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. योगिता महाजन तळेकर यांचा साईबाबा जन्मस्थान मंदिरात गौरव

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. योगिता महाजन तळेकर यांचा साईबाबा जन्मस्थान मंदिरात गौरव

जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. योगिता महाजन तळेकर यांचा साईबाबा जन्मस्थान मंदिरात गौरव

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In