• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सातपुड्याचा भूमीतील नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा येथील सुपुत्राची राज्यस्तरीय भरारी !

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
सातपुड्याचा भूमीतील नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा येथील सुपुत्राची राज्यस्तरीय भरारी !
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या नाशिक विभागासह मुंबई-कोकण विभागाची धुरा डॉ. मणिलाल शिंपी यांच्या खांद्यावर….शहादा ते मुंबई… जिद्द, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवासः

ठाणे:कल्याण (प्रतिनिधी)
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील परिवर्धां या छोट्याशा गावातील सर्वसामान्य कुटुंबातील सुपुत्र डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी यांनी आपल्या अथक परिश्रम, सामाजिक बांधिलकी आणि रस्ता सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याच्या जोरावर राज्यस्तरीय मानाचा टप्पा गाठला आहे.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) म्हणून त्यांच्यावर मुंबई व कोकण विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असून, ही नियुक्ती संपूर्ण सातपुड्यातील नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ IPS अधिकारी व पोलिस महासंचालक आदरणीय श्री. सदानंद वसंत दाते यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. मुंबई-कोकण विभागाचे शिक्षण उपसंचालक आदरणीय राजेंद्र कंकाळ आणि नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय श्री. संजय राठोड यांच्या अधिकारांतर्गत ही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच ठाणे शहर वाहतूक पोलीस उपआयुक्त आदरणीय श्री. पंकज शिरसाट यांच्या प्रेरणेने या अभियानाला अधिक गतिमान स्वरूप प्राप्त झाले आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक


विस्तृत विभागाची जबाबदारी
डॉ. मनिलाल शिंपी यांच्याकडे मुंबई, ठाणे, संपूर्ण कोकण विभाग, रायगड, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश असलेला विस्तृत विभाग सोपविण्यात आला आहे.
रस्ता सुरक्षा जनजागृती, विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्त, हेल्मेट व सीटबेल्ट वापराबाबत जागरूकता, मोबाईल वापर टाळणे, अपघात प्रतिबंध आणि सुरक्षित वाहतुकीसाठी समाजप्रबोधन हे त्यांच्या कार्याचे प्रमुख केंद्रबिंदू राहणार आहेत.
सेवाभावातून घडलेले व्यक्तिमत्त्व
डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी हे केवळ अधिकारी नसून एक प्रेरणादायी सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत त्यांनी रस्ता सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवत युवक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती निर्माण केली आहे.
त्यांच्या कार्यात सातत्य, प्रामाणिकपणा, शिस्त, नम्रता आणि समाजाप्रती असलेली निष्ठा स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळेच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


तरुणांसाठी प्रेरणास्थान
परिवर्धांसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत राज्यस्तरावर महत्त्वाची जबाबदारी मिळविणे ही बाब आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर कोणतेही ध्येय अशक्य नाही,” हे डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या यशातून अधोरेखित होत आहे.
त्यांच्या निवडीबद्दल
महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे अध्यक्ष श्री.संजय शेंडे ,राज्य उपाध्यक्ष श्री.पी. एस. महाजन, खजिनदार श्री.श्याम फाळके, प्रशिक्षण प्रमुख पोहरे , विभागीय उपाध्यक्ष डॉ. सिकंदर शेख यांच्याकडून विशेष अभिनंदन करण्यात आले असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच अहिल्यानगर जिल्हा समादेशक प्रकाश मिंड, मुंबई उपाध्यक्ष हिराजी पाटील, कायदेविषयक सल्लागार ॲड.डॉ.के. डी.पाटील, मुंबई विभागीय नोडल अधिकारी दिलीप स्वामी, ठाणे जिल्हा नोडल ऑफिसर डॉ. जितेंद्र सोनवणे, नोडल ऑफिसर निलेश नरवडे, सुभाष गायकवाड, बाळा साठे, मुख्याध्यापक रमाकांत पाटील, गुलाबराव पाटील,ठाणे जिल्हा आरएसपी मार्गदर्शक समाजसेवक माणिक पाटील,यांच्यासह ठाणे मुंबई,नाशिक विभागातील सर्व आर एस पी अधिकारी यांनीही अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे
प्रमुख पदाधिकारी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील,चंद्रानंद कृषी पणन संस्थेचे अध्यक्ष डॉ. यशवंत अनंत म्हात्रे , उद्योजक समाजसेवक डॉ. रामचंद्र देसले,


समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ.सोन्या काशीनाथ पाटील, समाजसेवक उद्योजक,डॉ. यशवंत महादू सोरे, पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष तथा आदित्य टाइम्स चे संपादक ॲड. सोमनाथ बाळाराम ठाकरे, स्वामीनारायण हॉलचे संचालक डॉ. दिनेशभाई ठक्कर, रोटी डे ग्रुपचे डॉ.निखिल चंदेरीया, अस्तित्व फाउंडेशनच्या रश्मी शर्मा, लेडीज एक्सप्रेस ग्रुपच्या डॉ. मधुबन ठक्कर, एम एल म्हात्रे महाविद्यालयाचे संस्थापक समाजसेवक श्री.करसन धोंडू ठाकरे, प्राचार्य गोरक्षनाथ तरे,प्राचार्य सचिन ठाकरे, सचिव रुपेश तरे,प्रा.मयुरेश दळवी,डॉ. आर आर कसबे, प्रा.हर्षल शेटे,विनायक ढोबळे, यांच्यासह सर्व मित्रमंडळीकडून कडून अभिनंदन करण्यात येत असून भावी काळात यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर
विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय स्तरातून डॉ.मनिलाल रतीलाल शिंपी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली रस्ता सुरक्षा अभियान अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचेल,असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे

Tags: Pandhurang Shimpi
Previous Post

आळंदी देवस्थानातील दानपेटी अपहार प्रकरणी आरोपी अटकेत

Next Post

श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी प्रशालेच्या दहावी निकालाच्या यशाबद्दल शिक्षकांचा सन्मान

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी प्रशालेच्या दहावी निकालाच्या यशाबद्दल शिक्षकांचा सन्मान

श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी प्रशालेच्या दहावी निकालाच्या यशाबद्दल शिक्षकांचा सन्मान

ताज्या बातम्या

शिवभक्‍ताचे सुरक्षेसाठी गांधीग्राम पुर्णा नदी येथे बचाव पथके सज्‍ज

शिवभक्‍ताचे सुरक्षेसाठी गांधीग्राम पुर्णा नदी येथे बचाव पथके सज्‍ज

August 25, 2026
गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

August 24, 2026

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

August 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In