• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शिरूरमध्ये “दामिनी पथक” सुरू करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शिरूरमध्ये “दामिनी पथक” सुरू करण्याची मागणी
0
SHARES
374
VIEWS
Ad 1
Ad 1

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलीम सय्यद यांचे पोलिस प्रशासनाला पत्र

पुणे प्रतिनिधी

शिरूर :
शिरूर शहरातील महिला, विद्यार्थिनी आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात विशेष “दामिनी पथक” कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तथा नगरसेविका आयेशा कलीम सय्यद यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केजेंळे यांना सविस्तर पत्र देत महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

दि. १४ जून २०२६ पासून शाळा व महाविद्यालये सुरू होत असल्याने शहरातील विविध शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानके, मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

सध्या सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण होत असून काही ठिकाणी छेडछाड, गैरवर्तन तसेच महिलांना असुरक्षित वाटत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे शिरूर शहरात स्वतंत्र “दामिनी पथक” सुरू करून शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानक, बाजारपेठ तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी नियमित गस्त घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे पथक कार्यान्वित झाल्यास महिलांना व विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होईल. तसेच महिलांवरील गैरप्रकारांना प्रतिबंध होऊन नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वासही आयेशा सय्यद यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम १९६५ अंतर्गत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे शिरूर शहराच्या दृष्टीने महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत “दामिनी पथक” तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

या पत्राची प्रत पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच वाहतूक शाखेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही देण्यात आली असून, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर तातडीने सकारात्मक कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Tags: Avinash Ghogare
Previous Post

“एमआयडीसी” प्रकल्पाविरोधात गोंडपिपरीत आक्रोश

Next Post

किल्ले धारूर येथे श्री पुरुषोत्तम मासानिमित्त श्री भागवत कथा महापुराणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
किल्ले धारूर येथे श्री पुरुषोत्तम मासानिमित्त श्री भागवत कथा महापुराणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

किल्ले धारूर येथे श्री पुरुषोत्तम मासानिमित्त श्री भागवत कथा महापुराणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In