• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माझ्या भारत देशाची अद्भुत सफर -भारत भ्रमण संस्कृती आणी सौंदर्याचा संगम *ओमप्रकाश शर्मा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
माझ्या भारत देशाची अद्भुत सफर -भारत भ्रमण संस्कृती आणी सौंदर्याचा संगम *ओमप्रकाश शर्मा
0
SHARES
53
VIEWS
Ad 1
Ad 1

*माझ्या भारत देशाची अद्भुत सफर -भारत भ्रमण संस्कृती आणी सौंदर्याचा संगम *ओमप्रकाश शर्मा*

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मित्रहो, आजचा हा भारत भ्रमणा चा लेख पाचवा…
,..आजचा हा लेख मी वाचकांपर्यंत पोहोचवत आहे, भारत भ्रमण चा लेख, भारत भ्रमण करताना भारतातील इस्कॉन मंदिर, ओम मंदिर, इस्कॉन चे जे जे भारत देशात मंदिरे आहेत ते सर्व मी पाहिले व दर्शन घेऊन आलोय,, मायापुर पश्चिम बंगाल इस्कॉन मंदिर असो की बेंगलोर, पुणे, तिरुपती असो किंवा भारतातील प्रत्येक शहरातील इस्कॉन मंदिरे मी बघितली, अतिशय सुंदर सुबक भगवंताच्या मूर्ती त्या मंदिरात आहेत, बघायला मिळतात , सर्व शीख गुरुद्वारे, चर्च, बौद्ध स्तूप, मस्जिद, हिंदू मंदिर सर्व, किल्ले, राजवाडे
इतिहासाच्या पाऊलखुणा, संस्कृतीचा संगम, प्राचीन आणि आधुनिक ठिकाणी मी भेटी दिल्या, निसर्ग, निसर्गाची रचना लेक असो की , अभयारण्ये,गार्डन,झरणे धबधबे, प्राणी संग्रहालय, मी फिरताना एक रोमांचक सफर, साहसी भारत, भारताची अनवट वाट, छोटे मोठे सर्व ठिकाण,भारत दर्शन, माझे अनोखे अनुभव, सर्व मी कमी बजेटमध्ये केले, अत्यंत प्रेरणादायी आणि भावनिक, आपला अतुल्य भारत देश एक अद्भुत सफारी, माझी भारत यात्रा मी हिमालय पासून कन्याकुमारी पर्यंत व सेवन सिस्टर ते पोरबंदर ओखा,दिव दमन पर्यंत, स्वदेश दर्शन भारताच्या मातीत दडलेले सौंदर्य, भारताची भटकंती एक अविस्मरणीय अनुभव, संस्कृती व इतिहास विविधतेत एकता, भारत भ्रमणाची एक झलक माझ्या भारत यात्रेचे संस्मरण, आज ह्या लेखद्वारे मी माझ्या शब्दातून मांडत आहे,


भारत भ्रमण, एकाच देशात अनेक देश अनुभवण्यासारखा एक अद्भुत प्रवास आहे, बर्फाच्छादित शिखरे, राजस्थान मधील वाळवंट, केरळ मधील बॅकवॉटर, आसाम मधील चहा चे मळे, दक्षिण भारतातील मंदिरे व काश्मीरचे सौंदर्य असे वैविध्यपूर्ण अनुभव भारताच्या यात्रेमध्ये मला मिळाले, विविधता इतिहास आणि संस्कृतीचा हा उत्तम मिलाप आहे,
भारत भ्रमणामधील काही प्रमुख आकर्षण म्हणजे उत्तर भारतातील, दिल्लीतील ऐतिहासिक वास्तू, आग्रा येथील ताजमहाल,अमृतसर चे स्वर्ण मंदिर, भारत पाकिस्तान ची सीमा व हिमालयातील सुंदरसे निसर्ग सौंदर्य, दक्षिण भारतातील केरळ,तामिळनाडू आणि कर्नाटक राज्य, तामिळनाडू मधील भव्य दिव्य मंदिरे , कला कुसर, संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा अद्भुत अनुभव, पश्चिम भारतातील महाराष्ट्र गुजरात कोकण आणि राजस्थान मधील किल्ले वाळवंट आणि खाद्य संस्कृती, पूर्व ईशान्य भारतामधील अरुणाचल प्रदेश, ची नैसर्गिक सौंदर्य, माणिपूर मेघालय , अननस व चहाचे मळे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले ठिकाणे, मित्रहो भारत भ्रमण करताना तुम्हाला काही टिप्स देऊ इच्छितो, प्रवासापूर्वी योग्य नियोजन करणे भेट देण्याची ठिकाणे आहेत राहण्याची सोय खानपान याचा पूर्व अभ्यास करणे, वाहतूक मध्ये रेल्वे भारत फिरण्यासाठी उत्कृष्ट आणि स्वस्त पर्याय आहे, स्थानिक संस्कृती स्थानिक लोकांच्या खाण्या पिण्याचे, संस्कृती परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न करा, भारत भ्रमणामुळे केवळ मनोरंजन च नव्हे तर इतर आपल्याला देशाच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृती बद्दल खूप काही शिकायला मिळते,


आपला भारत देश हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालेला भारत 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक बनला हा जगातील सातवा सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला आणि सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे,
नवी दिल्ली ही भारताची राजधानी असून 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा हा एक संघ आहे,
भारत आशिया खंडाच्या दक्षिणेस असून पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेस हिंद महासागर आहे, उत्तरेस हिमालय पर्वत रांगा आहेत, विविधतेत एकता हे भारताचे मुख्य वैशिष्ट्य असून येथे अनेक धर्मभाषा, संस्कृती आणि सणवार एकत्र नांदतात, आपला भारत देश की प्राचीन हिंदू संस्कृतीची भूमी असून अनेक थोर राज्य सम्राट आणि थोर पुरुषांचा इतिहास येथे घडला आहे, संस्कृती अध्यात्मिक ज्ञानाचा वारसा लाभलेला एक सामर्थ्यशाली देश म्हणून जगात आपला भारत देश ओळखला जातो, भारताचे प्राचीन आणि जुने नाव जंबुदीप व भारत वर्ष हे देखील होते,


ऐतिहासिक ग्रंथानुसार राजा भरत यांच्या नावावरून या भूमीला भारत म्हटले गेले तसेच आर्य संस्कृती नुसार आर्यवर्त असे संबोधले जात असे,
प्रत्येक राज्यातील प्रत्येक शहरात फिरताना त्या त्या राज्यातील विविधता तेथील मंदिरे अभयारण्य गार्डन किल्ले लेक, राजवाडे, तारांगण, म्युझियम हे सर्व पाहून मला आपल्या देशाचा फार अभिमान वाटला, पर्यटन म्हटले की काही गोष्टी व्यवस्थित प्लॅन केल्यामुळे आणि काही गोष्टी अचानक अनुभवायला मिळाल्यामुळे मनाला खूप छान वाटते,
काश्मीरच्या ट्रिप मध्ये केरळच्या ट्रिप मध्ये अंदमानच्या ट्रिप मध्ये लक्षदीपच्या ट्रीप मध्ये, लेह लड्डाख आणि सेव्हन सिस्टर्स फिरताना मला खूप खूप मनाला आनंद वाटला,
एखादे देऊळ बघायला जावे आणि त्या देवळाच्या पाठीमागे एखादा खळ खळ वाहणारा धबधबा , किंवा हिरवीगार टेकडी दिसावी मग तिथे रमावे असे मी खूप ठिकाणी अनुभवले,
एकंदर काय तर भारत भ्रमण मध्ये प्रवास म्हणजे नव्या अनुभवांची पोचडी प्रवासात सोबत घेऊन आपले नाक कान डोळ्यांनी मेंदू उत्सुक ठेवला की अनेक अनुभव घेत आपण शहाणे होऊ शकतो, प्रवास विषयक एक कोटेशन बनवून आपण जेवढे प्रवास करू तेवढे नम्र होतो कारण विविधतेने नटलेल्या मोठ्या जगात आपण किती छोटे आहोत हे आपल्याला समजते,
विज्ञान भूगोल ऐतिहासिक पुस्तके वाचताना पाठ्यपुस्तकात अनेक स्थळाचा उल्लेख येतो यातील काही ठिकाणांची रंजक माहिती मी स्वतः भारत भ्रमण करताना प्रवास करताना मला अनुभवयास मिळाली, बरेच ठिकाण पाहिलेली, ती आठवल्यानंतर मनाला कायम आनंद देत राहतात,
मी भारत भ्रमण करताना टप्प्याटप्प्याने अकरा ते बारा वर्षे प्रवास करून स्व कमाई ने व एकट्याने स्वतःचे 18 लाख रुपये जवळपास खर्च करून मी संपूर्ण भारत देश आपला फिरून, अनुभवाची शिदोरी आज माझ्याजवळ आहे आणि खूप काही भारत देशातील धार्मिक स्थळांची पर्यटन स्थळांची माहिती ज्ञानदेखील माझ्याकडे आहे म्हणजे मला प्राप्त झाले मित्रहो,.. भारत देशातील सर्व नद्या, आणि अरबी समुद्र हिंद महासागर बंगालची खाडी हे सर्व ठिकाणी मी फिरलो, चार धाम यात्रा असो की सर्व शक्तीपीठे सर्व धर्मातील सर्व प्रसिद्ध धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे त्या ठिकाणी मी जाऊन आलो मित्रांनो, भारत देशाबद्दल वर्णन करावे तेवढे कमी च आहे, शब्द खूप अपुरे पडतील मित्रहो लिहायचे म्हंटल्यास, पाहुणचार कौटुंबिक मूल्ये,लवचिकता, शिक्षणप्रती आदर, अध्यात्मिकता ,शैक्षणिकता आणि सर्जनशीलता हे सर्व भारतीया मधील सदगुण आहेत, भारताचे चैतन्यमय आणि वैविध्यपूर्ण समाजाच्या जडणघडणीत योगदान देतात,


मला भारत देश का आवडतो कारण की भारताला एक गौरवशाली इतिहास असून प्राचीन संस्कृती लाभलेली आहे, आपले अनेक सण आहेत आणि आपण विविध संस्कृती परंपराचे पालन करतो, उत्तरेकडील हिमालय,पर्वतरांगा आपले रक्षण करतात, भारत अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, आणि हिंद महासागराने वेढलेला आहे अद्भुत सौंदर्य जंगले, गंगा यमुना सरस्वती या केवळ नद्या नसून त्याचे पाणी अमृत समान आहे, ऋषीमुनींची साधू संताची तपस्वी भूमी, अनेक ठिकाणी गुफे मध्ये साधू संत तपस्या करताना मी पाहिलेत,
उत्तराखंड ही देवभूमी, आणि भूतान व नेपाळ देश हे दोन देश सुद्धा मी भारत भ्रमण सोबतच हे 2 देशही फिरलो मित्रांनो, मन खूप खूप प्रफुल्लित आणी आनंदी झाले, भारत भ्रमण करून भारत देश पाहुन आपला सर्व…. मनात निश्चय केला होता मी भारत भ्रमण करायचे ते मी पूर्ण ही केले ह्याचा मला स्वाभिमान आहे..
. ग्रामीण भागातून अनेक समस्या बाजूला ठेवून, साहस चिकाटी जिद्द अंगी जोपासून एकट्याने भारत भ्रमण मी केले, बघता बघता 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश अंदमान व लक्षद्विप व भूतान नेपाळ देशात ही 2 /3 वेळा जाऊन तेथील मंदिर, स्तूप व निसर्ग खूप जवळून पाहावयास मिळाला मला, अरुणाचल प्रदेश तवांग असो की, नाथुला पास, बुमला पास, सेला पास, झोजीला पास, असे अनेक रोमांचक रस्ते तेथून प्रवास करताना चा थरारक अनुभव अविस्मरणीय च, काश्मीर मधील निसर्ग स्वर्ग च जणू…. हिमाचल मधील देवदर्शन हिमालय पर्वत अतिशय विहंगम नजारे बघत च राहावे आणी अंगाला शहारा यावा असे काही ठिकाणे सुद्धा पाहायला मिळाले…
विविध प्रकारचे पशु,पक्षी प्राणी,वनस्पती, झाडे, फुले, फळाच्या बागा, अनेक वृक्ष, जे कधीच पाहायला मिळाले नाहीत ते बघण्याचे भाग्य ही मला लाभले, ईश्वराची कृपा….. मित्रहो एकच जरूर सांगेन आपण सुद्धा पर्यटन व धार्मिक स्थळें फिरून यावे. व ज्ञान वाढते खूप प्रवासाने हे नक्कीच सांगेल मी…
काही माहिती हवी असल्यास आपण मला सोशल मीडिया वर व गुगल वर शोधू शकता… भारत भ्रमण किया हुवा युवक हे नावं गुगल वर टाकावे किंवा माझे हे दोन मोबाईल क्रमांक देखील आपण गुगल वर टाकून पाहू शकता 9156438966/9975375264… ओमप्रकाश श्रीनिवास शर्मा.. बोरी. ता -जिंतूर जिल्हा परभणी. महाराष्ट्र….

Ad 1
Tags: Omprakash Sharma
Previous Post

पिंपळखुटा रस्त्यावरील पुलांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका-बिरसा फायटर्सची मागणी

Next Post

मलठण ग्रामपंचायतीतील १५ टक्के मागासवर्गीय निधी गैरव्यवहाराचा आरोप; माहिती अधिकारातून धक्कादायक बाबी समोर

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
मलठण ग्रामपंचायतीतील १५ टक्के मागासवर्गीय निधी गैरव्यवहाराचा आरोप; माहिती अधिकारातून धक्कादायक बाबी समोर

मलठण ग्रामपंचायतीतील १५ टक्के मागासवर्गीय निधी गैरव्यवहाराचा आरोप; माहिती अधिकारातून धक्कादायक बाबी समोर

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In