• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चारधाम यात्रा पूर्ण करून परतलेल्या बालाजी अधुरे यांचा आगळावेगळा सत्कार; जळकोटमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
चारधाम यात्रा पूर्ण करून परतलेल्या बालाजी अधुरे यांचा आगळावेगळा सत्कार; जळकोटमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात
0
SHARES
30
VIEWS
Ad 1
Ad 1

जळकोट | सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

जळकोट तालुक्यातील पाटोदा बु. येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर बालाजी अधुरे यांनी चारधाम यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण करून सुखरूप गावी परतल्यानंतर आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करून गावासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

चारधाम यात्रेनंतर बालाजी अधुरे यांनी गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी ओबर्स व पोळीचा पारंपरिक आस्वाद भाविकांना देण्यात आला. मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. “यात्रा करून परतल्यानंतर समाजासाठी काहीतरी करावे” या भावनेतून त्यांनी हा उपक्रम राबविल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, जळकोट नगरपंचायत अध्यक्षा सौ. प्रभावती चंद्रकांत काबळे यांच्या मुलाच्या मंगल विवाह सोहळ्याचाही शहरात मोठ्या उत्साहात समारंभ पार पडला. आयुष व प्रतीक्षा यांचा विवाह सोमवार दि. २५ मे रोजी दुपारी १२:३० वाजता संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार मा. संजय भाऊ बनसोडे साहेब, मा. बाबासाहेब जाधव साहेब, जळकोट उपनगराध्यक्ष मा. मन्मथ आप्पा किडे साहेब, डॉ. कलवले संजय नागनाथ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. विवाह सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

याचदरम्यान जळकोट शहरात अवकाळी पावसाने व जोरदार वाऱ्याने हजेरी लावली. शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात वारा व पाऊस पडल्याने काही ठिकाणी झाडे कोसळली तर अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. पत्रे सावरण्यासाठी व नुकसान टाळण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र शहरात दिसून आले.

सुदैवाने या नैसर्गिक आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

साटेली-भेडशी परिसरात अपघातांची मालिका; रस्ते कामातील हलगर्जीपणामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात!

Next Post

परभणीचे आमदार राहुल पाटील यांची श्री आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे भेट

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
परभणीचे आमदार राहुल पाटील यांची श्री आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे भेट

परभणीचे आमदार राहुल पाटील यांची श्री आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे भेट

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In