• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

कृषी विद्यापीठाच्या अहवालावरून जिल्हाधिकाऱ्यांची सरकारकडे आग्रही शिफारस

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

‘तांत्रिक उत्पादन’ (Technical Yield) प्रणाली प्रत्यक्ष परिस्थितीच्या विसंगत परिणाम देत असल्याचे सिद्ध झाले आहे. सदर प्रणाली नवीन असल्याने त्यातील काही त्रुटी आणि मर्यादाही स्पष्ट झाल्या आहेत. या गंभीर विसंगतीबाबत आग्रही पाठपुरावा करून आपण जिल्हा प्रशासनाला कृषी विद्यापीठाकडून वैज्ञानिक अहवाल मागविण्यास भाग पाडले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ‘तांत्रिक उत्पादन’ अहवालात करण्यात आलेले दावे फेटाळून लावत हे मॉडेल विसंगत असल्याचा स्पष्ट अहवाल दिला आहे. त्यानुसार धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मंडळनिहाय उत्पादकता ग्राह्य धरूनच शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी अशी शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. आपण केलेल्या आग्रही पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

खरीप हंगाम २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण ५,७२,२०३ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती, ज्यापैकी तब्बल ८० टक्के क्षेत्रावर म्हणजेच सुमारे ३.९६ लक्ष हेक्टरवर केवळ सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. जिल्ह्यातील ४,९६,०९१ शेतकऱ्यांनी आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीकडे आपली पिके विमा संरक्षित केली होती. मात्र, मे २०२५ मध्ये मागील २६ वर्षांतील सर्वाधिक २७९.६ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर जून ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात तब्बल २२० वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातच १४१ वेळा अतिवृष्टी झाल्याने सरासरीच्या १५९ टक्के पाऊस कोसळला. यामुळे सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शेतात पाणी साचले, बुरशीजन्य रोग पसरले आणि उभे पीक कुजून गेले. शासकीय पंचनाम्यानुसार ९२ टक्के (५.७७ लक्ष हेक्टर) क्षेत्र बाधित झाले होते. नुकसानीची तीव्रता पाहता जिल्ह्यात ५०४ पीक कापणी प्रयोग नियोजित होते. मात्र, विमा कंपनीने यातील ३६८ प्रयोगांवर जाणीवपूर्वक आक्षेप घेतले. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत ५० टक्के पीक कापणी प्रयोग आणि ५० टक्के तांत्रिक उत्पादन (DSSAT मॉडेल) यांच्या सरासरीवर आधारित अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात प्रत्यक्ष शेतात ३ ते ४ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन आलेले असताना, तांत्रिक मॉडेलचा वापर करून महसूल मंडळांमध्ये १० ते १२ क्विंटल उत्पादन दाखवण्यात आले आणि जिल्ह्यातील एकूण नुकसान केवळ १० टक्केच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या अन्यायकारक निष्कर्षावर आपण तीव्र आक्षेप घेतला. केवळ आक्षेप घेऊन न थांबता तांत्रिक उत्पादनाचे निकष कोणत्या आधारे ठरवले गेले, याची तज्ञांमार्फत सखोल पडताळणी (Independent Expert Assessment) करण्याची मागणी आपण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून,तर कृषी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली होती. कृषी मंत्र्यांनी कृषी सचिवांना तातडीने याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. आपण केलेल्या मागणीवरून जिल्हा प्रशासनाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना वैज्ञानिक अहवाल सादर करण्याची विनंती केल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र प्रकल्पातील तज्ञ शास्त्रज्ञांनी यावर सखोल संशोधन करून २२ मे २०२६ रोजी आपला अंतिम अहवाल सादर केला. त्यानुसार तांत्रिक उत्पादन मॉडेल हे जिल्ह्यातील प्रत्यक्ष भौगोलिक आणि हवामान परिस्थितीशी पूर्णतः विसंगत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. हे मॉडेल केवळ अजैविक घटकांचा विचार करीत असून खरीप २०२५ मधील सततचा पाऊस, सततचे ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाची कमतरता आणि त्यामुळे पडलेली कीड-रोग (मूळ कुजणे, बुरशी) यामुळे झालेले २५ ते ३० टक्के नुकसान या मॉडेलमध्ये मोजलेच गेले नाही. परंडा, मांगरूळ, धाराशिव शहर, सावरगाव, सोनारी या मंडळांमध्ये प्रत्यक्ष उत्पादन आणि मॉडेल दाखवत असलेले उत्पादन यात तब्बल २५०% ते ३५०% पर्यंतची प्रचंड मोठी तफावत आहे, जी वैज्ञानिकदृष्ट्या चुकीची आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ‘पीक कापणी प्रयोगातून’ कमी आलेले उत्पादनच शास्त्रशुद्ध व खरे असल्याचे कृषी विद्यापीठाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. राज्यस्तरीय समितीने यापूर्वी कृषी आयुक्तालय व ‘YES TECH’ च्या अहवालानुसार विमा देण्याचे निर्देश कंपनीला दिले होते, परंतु विमा कंपनीने त्याविरुद्ध केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले आहे. आता कृषी विद्यापीठाच्या या महत्त्वाच्या वैज्ञानिक अहवालाचा आधार घेत, धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अधिकृत पत्र पाठवले आहे. केंद्र शासनाने निर्धारित केलेली ही संगणकीय प्रणाली अर्थात तांत्रिक उत्पादकता अमान्य करून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मंडळनिहाय उत्पादकतेच्या आधारेच न्याय्य पीक विमा भरपाई देण्यात यावी, अशी आग्रही शिफारसही जिल्हाधिकाऱ्यांनी आपण दिलेल्या पत्रावर प्राप्त झालेल्या कृषी विद्यापीठाच्या अहवालाच्या आधारे शासनाकडे केली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू राहील : आमदार राणाजगजितसिंह पाटील

ही तांत्रिक पद्धत आपणास मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले. केवळ अमान्य करून न थांबता शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या नुकसानीचा मोबदला मिळावा यासाठी ठरवून दिलेल्या पद्धतीमुळे आपल्याकडे आलेली तफावत निदर्शनास आणून दिली.आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे कृषी विद्यापीठाच्या वैज्ञानिक अहवालाने तांत्रिक उत्पादन मॉडेल हे जिल्ह्यातील प्रत्यक्ष भौगोलिक आणि हवामान परिस्थितीशी पूर्णतः विसंगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील एकाही बाधित शेतकरी बांधवाला आपण त्याच्या हक्कापासून वंचित राहू देणार नाही. केंद्रीय समितीकडून शेतकऱ्यांच्या बाजूनेच निर्णय व्हावा यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहील असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Ad 1
Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…

Next Post

28 आणि 29 मे रोजी सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान बंद

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
28 आणि 29 मे रोजी सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान बंद

28 आणि 29 मे रोजी सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान बंद

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In