• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अतिक्रमण हटविण्याऐवजी पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

कळमनुरी

शहरातील गोरगरीब हातगाडी चालक, फळ विक्रेते, चहा-खिचडी विक्रेते, पानटपरी चालक, भाजीपाला विक्रेते तसेच छोटे व्यापारी यांच्यावर वारंवार अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा राबविण्याऐवजी त्यांचे नियमबद्ध पुनर्वसन करण्यात यावे आणि शहरात स्वतंत्र हॉकर्स व्हेंडिंग झोन निर्माण करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कळमनुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी ही माहिती दिली. यावेळी युवा तालुकाध्यक्ष मोहम्मद अस्लम, महासचिव दिनेश पाईकराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, शहरातील अनेक गोरगरीब व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणजे रस्त्यावरील छोटे व्यवसाय आहेत. मात्र प्रशासनाकडून वारंवार अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा राबविल्या जात असल्याने या व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. काही दिवस व्यवसाय हटविले जातात, परंतु पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे व्यापाऱ्यांना पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू करावा लागतो.

यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून प्रशासनाचा वेळ आणि शासनाचा महसूलही वाया जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरत्या कारवाया केल्या जात असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात तातडीने हॉकर्स व्हेंडिंग झोन तयार करून “नो व्हेंडिंग” आणि “व्हेंडिंग” क्षेत्र निश्चित करण्याची मागणी केली. तसेच व्हेंडिंग कमिटीची त्वरित स्थापना करून पुनर्वसनाशिवाय कोणतीही कारवाई करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी भारतीय संविधानातील अनुच्छेद 19(1)(g) नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला व्यवसाय करण्याचा अधिकार असल्याचे अधोरेखित करण्यात आले. हातगाडी चालक, फेरीवाले आणि छोटे दुकानदार यांच्या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने प्रशासनाने संवेदनशील आणि नियमबद्ध निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

केंद्र शासनाच्या Street Vendors Act 2014 ची प्रभावी अंमलबजावणी करून गोरगरीब व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे, रोजगार संरक्षण द्यावे तसेच नगरपरिषदेचा महसूल वाढेल असे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.

शहरातील हा प्रश्न अत्यंत गंभीर असून नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.

Ad 1
Tags: Satish Pandit
Previous Post

HDFC बँकेवर 45 कोटींच्या व्यवहारप्रकरणी संशय; अंतर्गत चौकशी सुरू

Next Post

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In