• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिखलीत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
चिखलीत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

चिखली | प्रतिनिधी

विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन, श्री क्षेत्र टाळगाव चिखली यांच्या वर्धापन दिनानिमित्त चिखली परिसरातील इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. ९ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संत तुकाराम महाराज हॉल, चिखली येथे संपन्न होणार आहे.

RelatedPosts

खटाव तालुक्यात गारपीटसह पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

खंडाळा येथे मुलाकडून वडिलांचा खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

माळवाडगावच्या दोन कन्यांची मुंबई पोलीस दलात निवड; अशोक कारखान्याच्या वतीने सत्कार

या उपक्रमासाठी चिखली पोलीस स्टेशनचे मार्गदर्शक श्री. साळुंखे साहेब यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी किंवा १२ वीची गुणपत्रिका (झेरॉक्स), आधार कार्ड झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो व संपर्क क्रमांकासह अर्ज सादर करावेत. ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी पालकांसह उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख ७ जून २०२६ असून अर्ज विकासभाऊ साने जनसंपर्क कार्यालय, चिखली येथे स्वीकारण्यात येत आहेत.

याच वर्धापन दिनानिमित्त रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विकासभाऊ साने जनसंपर्क कार्यालय, चिखली येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या सामाजिक उपक्रमांद्वारे शिक्षण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याबरोबरच समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष विकास नामदेव साने यांनी सांगितले.

नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या दोन्ही उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

पुण्यातील कथित विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई; ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन

Next Post

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; वादळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीचा अहवाल ८ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश

Related Posts

खटाव तालुक्यात गारपीटसह पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
Blog

खटाव तालुक्यात गारपीटसह पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

June 4, 2026
0
Blog

खंडाळा येथे मुलाकडून वडिलांचा खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

June 4, 2026
0
Blog

माळवाडगावच्या दोन कन्यांची मुंबई पोलीस दलात निवड; अशोक कारखान्याच्या वतीने सत्कार

June 4, 2026
0
कोहजगाव ग्रामस्थांचा पुढाकार; गणपती विसर्जन खदानीतील गाळ काढण्याचे काम स्वखर्चाने सुरू
Blog

कोहजगाव ग्रामस्थांचा पुढाकार; गणपती विसर्जन खदानीतील गाळ काढण्याचे काम स्वखर्चाने सुरू

June 4, 2026
0
Blog

जनतेचा नगराध्यक्ष थेट मदतीला; वादळी पावसानंतर रात्रभर रस्ते मोकळे करण्यासाठी आतिष (सोनू) बोरेले यांची धडपड

June 4, 2026
6
Blog

भिवंडीत गावठी दारूच्या अड्ड्यांवर धडक कारवाई; १० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

June 4, 2026
0
Next Post
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; वादळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीचा अहवाल ८ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; वादळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीचा अहवाल ८ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश

ताज्या बातम्या

खटाव तालुक्यात गारपीटसह पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

खटाव तालुक्यात गारपीटसह पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

June 4, 2026

खंडाळा येथे मुलाकडून वडिलांचा खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

June 4, 2026

माळवाडगावच्या दोन कन्यांची मुंबई पोलीस दलात निवड; अशोक कारखान्याच्या वतीने सत्कार

June 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In