• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुण्यातील कथित विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई; ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
पुण्यातील कथित विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई; ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे | प्रतिनिधी

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या कथित विषारी दारू विक्री प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. कर्तव्यातील हलगर्जीपणा, अवैध दारू विक्री रोखण्यात आलेले अपयश आणि देखरेखीतील त्रुटी यांमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

RelatedPosts

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी दापोडी पोलीस चौकीतील सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

प्राथमिक चौकशीत संबंधित भागात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती उपलब्ध असतानाही आवश्यक ती कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर पुढील प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

“अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अथवा अधिकाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाविरोधातील प्रशासनाच्या भूमिकेबाबत महत्त्वाचा संदेश गेला असून, संबंधित प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना नागापूर ग्रामपंचायतीत अभिवादन

Next Post

चिखलीत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Related Posts

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!
Blog

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026
9
तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश
Blog

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

November 5, 2026
57
स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
Blog

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
7
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!
Blog

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

November 3, 2026
43
भांबर्डे येथे शिक्षण परिषदेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान!
Blog

भांबर्डे येथे शिक्षण परिषदेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान!

November 3, 2026
71
नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!
Blog

नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!

November 3, 2026
13
Next Post
चिखलीत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

चिखलीत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

SIR-2026 मधील शून्य कामकाजाची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून दखल; मुरबाड ERO यांना चौकशीचे निर्देश

SIR-2026 मधील शून्य कामकाजाची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून दखल; मुरबाड ERO यांना चौकशीचे निर्देश

November 5, 2026
मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास सभागृहात मांडला

मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास सभागृहात मांडला

November 5, 2026
भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In