• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

७ जूनपासून बालोपासना नववर्षाची सुरुवात; बालसंस्कार केंद्रात विनामूल्य प्रवेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
७ जूनपासून बालोपासना नववर्षाची सुरुवात; बालसंस्कार केंद्रात विनामूल्य प्रवेश
0
SHARES
186
VIEWS
Ad 1

जळगाव | प्रतिनिधी

प.पू. कलावती आई यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या बालोपासना (बालसंस्कार केंद्र) उपक्रमाच्या नवीन शैक्षणिक वर्षाची (२०२६-२७) सुरुवात रविवार, दि. ७ जून २०२६ पासून होत आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी, सुसंस्कार संवर्धनासाठी तसेच भारतीय संस्कृती, शिस्त, स्वच्छता आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बालोपासनेमध्ये दर रविवारी प्रार्थना, स्तोत्रपठण, कथा, भजन, व्यक्तिमत्त्व विकास, नैतिक शिक्षण आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे विविध उपक्रम घेतले जातात. या माध्यमातून बालकांमध्ये आत्मविश्वास, सेवाभाव, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि आध्यात्मिकतेची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

गेल्या वर्षभरात विविध केंद्रांवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आगामी वर्षातही संस्कार वर्ग, विशेष मार्गदर्शन सत्रे आणि विविध शैक्षणिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, बालोपासनेला नियमित उपस्थित राहणाऱ्या बालगोपाळांना प.पू. कलावती आई यांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातात. तसेच तबला, पेटी आणि भजनाचे विनामूल्य प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले जाते.

पालकांनी आपल्या मुलांना या संस्कारमय उपक्रमाशी जोडावे आणि अधिकाधिक बालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बालोपासना केंद्रे, वेळा व संपर्क क्रमांक

१) परमार्थ निकेतन – श्रीहरिमंदिर, जळगाव

शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, स्टेशन रोड, जिल्हा परिषद समोर, नवी पेठ, जळगाव
वेळ : दर रविवारी सकाळी ७.०० ते ८.३०
संपर्क : 9975360190

२) परमार्थ निकेतन, पिंप्राळा

ॐ शांती नगर, गुजराल पेट्रोल पंपासमोर, पिंप्राळा, जळगाव
वेळ : सकाळी ७.०० ते ८.३०
संपर्क : 9604063347

३) पारिजात कॉलनी केंद्र

५, पारिजात कॉलनी, भाऊ बंगला, मकरंद कॉलनी शेजारी, महाबळ, जळगाव
वेळ : सकाळी ८.०० ते ९.००
संपर्क : 9552515779

४) भोईटे नगर केंद्र

गट क्र. २९२ व २९३, प्लॉट क्र. ३७, यश लॉनजवळ, भोईटे नगर, जळगाव
वेळ : सकाळी ८.०० ते ९.००
संपर्क : 9881796723

५) सिद्धी गणेश मंदिर, शिव कॉलनी

गट क्र. ६०, शिव कॉलनी, जळगाव
वेळ : सकाळी ८.०० ते ९.००
संपर्क : 9403508985

६) हनुमान मंदिर, झोपेनगर

रामानंदनगरखाली, जळगाव
वेळ : सकाळी ८.०० ते ९.००
संपर्क : 9405762616

७) वज्रेश्वरी मंदिर, छत्रपती शिवाजी नगर

जळगाव
वेळ : सकाळी ८.०० ते ९.००
संपर्क : 8407925195

८) इंद्रप्रस्थ नगर केंद्र

इंद्रप्रस्थ नगर, जळगाव
वेळ : सकाळी ९.०० ते १०.००
संपर्क : 7588687316

बालसंस्कार, व्यक्तिमत्त्व विकास आणि भारतीय संस्कृतीची ओळख घडवणाऱ्या या उपक्रमात प्रवेश पूर्णतः विनामूल्य असून, जळगावातील पालक व बालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; वादळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीचा अहवाल ८ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश

Next Post

भिवंडीत गावठी दारूच्या अड्ड्यांवर धडक कारवाई; १० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

भिवंडीत गावठी दारूच्या अड्ड्यांवर धडक कारवाई; १० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In