• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतातील हातभट्टीचा दारू अड्डा उध्वस्त; २५ हजारांचा मुद्देमाल नष्ट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
शेतातील हातभट्टीचा दारू अड्डा उध्वस्त; २५ हजारांचा मुद्देमाल नष्ट
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

माहूर | प्रतिनिधी

माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात धडक कारवाई करत मौजे पापलवाडी येथील शेतातील हातभट्टीचा अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत दारू निर्मितीसाठी तयार करण्यात आलेले सुमारे २५ हजार रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नांदेड जिल्ह्यासह माहूर तालुक्यात रोजगाराचा अभाव आणि वाढती व्यसनाधीनता यामुळे हातभट्टी दारूचा व्यवसाय वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण होत असून सामाजिक समस्या वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत अवैध दारू निर्मितीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

याच मोहिमेअंतर्गत दि. ५ जून रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या नेतृत्वाखाली पापलवाडी येथील एका शेतातील टीनशेडमध्ये छापा टाकण्यात आला. येथे पाच टाक्यांमध्ये हातभट्टी दारू तयार करण्यासाठी मोहफुलापासून बनविण्यात आलेले रसायन आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.

या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानोबा खंदाडे, पोलीस कर्मचारी गोपानवाड यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध हातभट्टी दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी केले आहे.

Previous Post

मनपा शाळा क्रमांक ४९, पंचक येथील जॉगिंग ट्रॅक व ग्रीन जिमची दुरवस्था; नागरिकांचा संताप

Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निलेश भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निलेश भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निलेश भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In