• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मनपा शाळा क्रमांक ४९, पंचक येथील जॉगिंग ट्रॅक व ग्रीन जिमची दुरवस्था; नागरिकांचा संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
मनपा शाळा क्रमांक ४९, पंचक येथील जॉगिंग ट्रॅक व ग्रीन जिमची दुरवस्था; नागरिकांचा संताप
0
SHARES
78
VIEWS
Ad 1

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरातील जेलरोड प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत असलेल्या मनपा शाळा क्रमांक ४९, पंचक येथील जॉगिंग ट्रॅक आणि ग्रीन जिमची दुरवस्था झाल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक सकाळी आणि संध्याकाळी शाळेच्या आवारातील जॉगिंग ट्रॅकवर नियमितपणे चालण्यासाठी येतात. तसेच महानगरपालिकेने उभारलेल्या ग्रीन जिममधील विविध व्यायाम साहित्याचाही नागरिकांकडून वापर केला जात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ग्रीन जिममधील अनेक उपकरणे तुटलेल्या अवस्थेत असून ती वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत.

यामुळे नियमित व्यायाम करणाऱ्या नागरिकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, महानगरपालिका निवडणुकांच्या काळात अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी जॉगिंग ट्रॅकवर येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत होते. त्यावेळी ग्रीन जिमची दुरुस्ती, नवीन साहित्य बसविणे आणि जॉगिंग ट्रॅकचे नूतनीकरण करण्याची आश्वासने देण्यात आली होती. मात्र निवडणुका संपल्यानंतर या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

काही नागरिकांनी असा आरोपही केला की, परिसरातील इतर उद्यानांमधील सुविधा दुरुस्त करण्यात आल्या असल्या तरी पंचक येथील जॉगिंग ट्रॅक आणि ग्रीन जिमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

महानगरपालिका निवडणुका पार पडून महापौर, उपमहापौर तसेच विविध समित्यांची स्थापना होऊनही हा प्रश्न प्रलंबितच असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित आणि सुस्थितीत चालण्याचा ट्रॅक उपलब्ध नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

लवकरात लवकर जॉगिंग ट्रॅकचे डागडुजीकरण करण्यात यावे, ग्रीन जिममधील तुटलेली उपकरणे दुरुस्त करून नवीन साहित्य बसविण्यात यावे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Tags: Rahul Gade
Previous Post

शिक्षण हक्कासाठी रयत शेतकरी संघटनेचा एल्गार

Next Post

शेतातील हातभट्टीचा दारू अड्डा उध्वस्त; २५ हजारांचा मुद्देमाल नष्ट

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
शेतातील हातभट्टीचा दारू अड्डा उध्वस्त; २५ हजारांचा मुद्देमाल नष्ट

शेतातील हातभट्टीचा दारू अड्डा उध्वस्त; २५ हजारांचा मुद्देमाल नष्ट

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In