• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंगळे रोड परिसरातील नागरिकांच्या समस्यांसाठी नगरसेवक यश (दत्ताकाका) साने यांची संयुक्त पाहणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
पिंगळे रोड परिसरातील नागरिकांच्या समस्यांसाठी नगरसेवक यश (दत्ताकाका) साने यांची संयुक्त पाहणी
0
SHARES
167
VIEWS
Ad 1

चिखली | प्रतिनिधी

पिंगळे रोड परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित विविध समस्यांची दखल घेत नगरसेवक यश उर्फ दत्ताकाका साने यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

परिसरातील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छता तसेच इतर नागरी समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून संयुक्त पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची नोंद घेण्यात आली. तसेच तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निराकरण व्हावे यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी बोलताना नगरसेवक यश (दत्ताकाका) साने म्हणाले, “जनतेच्या समस्या जाणून घेणे, त्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि त्यांचे निराकरण करून घेणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी प्राथमिक जबाबदारी आहे. पिंगळे रोड परिसरातील प्रत्येक नागरिकाला आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”

या संयुक्त पाहणी दौऱ्यात स्थानिक नागरिक, सोसायटी पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नगरसेवक दत्ताकाका साने यांच्या पुढाकाराचे नागरिकांनी स्वागत करत परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Previous Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निलेश भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण

Next Post

पाटस येथे व्यावसायिक वादातून गोळीबार; आठ जण ताब्यात

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
7
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
13
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

पाटस येथे व्यावसायिक वादातून गोळीबार; आठ जण ताब्यात

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In