• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुमार बिरादार यांच्या जीवनपटावरील ‘सारथी’ पुस्तकाचे प्रकाशन; कार्यपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
कुमार बिरादार यांच्या जीवनपटावरील ‘सारथी’ पुस्तकाचे प्रकाशन; कार्यपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

उदगीर | प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कुमार बिरादार यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर आधारित ‘सारथी’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच त्यांच्या कार्यपूर्ती (सेवानिवृत्ती) निमित्त आयोजित गौरव सोहळा उदगीर येथील कृष्णाई मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी नेटुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी मंत्री तथा आमदार संजयजी बनसोडे, शिक्षक आमदार विक्रमजी काळे, माजी आमदार गोविंद केंद्रे, धनराजजी पांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुमार बिरादार यांच्या जीवनातील संघर्ष, जिद्द, कार्यनिष्ठा आणि यशस्वी शैक्षणिक वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘सारथी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर कार्यपूर्ती सोहळ्यानिमित्त कुमार बिरादार व त्यांच्या सौभाग्यवतींचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी गौरव समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात अनेक वक्त्यांनी कुमार बिरादार यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि मानवतावादी कार्याचा गौरव केला. गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

कुमार बिरादार यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी झाले असून समाजात त्यांनी आदर्श शिक्षक म्हणून स्थान मिळवले आहे.

विद्यार्थी, पालक आणि समाजमनावर त्यांच्या कार्याचा कायमस्वरूपी ठसा उमटला असून त्यांची कार्यपद्धती आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची भूमिका भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

या सोहळ्यास शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, मित्रपरिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुमार बिरादार यांच्या कार्याचा गौरव करणारा हा कार्यक्रम अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

Previous Post

नवेगाव परिसरात जिओ नेटवर्क ठप्प; डिजिटल व्यवहार व संवाद व्यवस्थेला मोठा फटका

Next Post

आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त अशोकराव मुळे यांचा निघोज ग्रामस्थ व मळगंगा ट्रस्टतर्फे सत्कार

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
161
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
60
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post
आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त अशोकराव मुळे यांचा निघोज ग्रामस्थ व मळगंगा ट्रस्टतर्फे सत्कार

आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त अशोकराव मुळे यांचा निघोज ग्रामस्थ व मळगंगा ट्रस्टतर्फे सत्कार

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In