• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त अशोकराव मुळे यांचा निघोज ग्रामस्थ व मळगंगा ट्रस्टतर्फे सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त अशोकराव मुळे यांचा निघोज ग्रामस्थ व मळगंगा ट्रस्टतर्फे सत्कार
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

निघोज | प्रतिनिधी

देवीभोयरे ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच अशोकराव मुळे यांना नुकताच लोकमत वृत्तसमूहाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ तसेच ‘एम. पी. बिरला आदर्श सरपंच पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला होता. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाल्याने निघोज ग्रामस्थ आणि मळगंगा ट्रस्टच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

देवीभोयरे गावात राबविण्यात आलेल्या विकासकामांमुळे आणि लोकाभिमुख कारभारामुळे अशोकराव मुळे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सत्कार समारंभात मळगंगा ट्रस्टचे कार्याध्यक्ष वसंतराव कवाद, उपाध्यक्ष अमृता शेठ रसाळ, माजी सरपंच ठकाराम शेठ लंके, उद्योजक शिवाजीराव लंके, रमेश आण्णा ढवळे, कांदा व्यापारी संतोष शेठ रसाळ, बबनराव ससाणे, विठ्ठल शेठ कवाद, दैनिक लोकमतचे पत्रकार भास्कर शेठ कवाद, मंगेशराव वराळ, पारनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाषराव बेलोटे, माजी सरपंच विठ्ठल शेठ सरडे, मुंबईकर मंडळाचे सन्माननीय सदस्य कचर निचित, माजी उपसरपंच संपतराव वाळुंज, माजी सरपंच जयवंतराव मुळे, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान बेलोटे, सेवा संस्थेचे माजी व्हा. चेअरमन प्रकाश मोरे, बाळासाहेब बेलोटे, संचालक वसंत गायकवाड, जगदंबा पतसंस्थेचे संचालक अनिल बेलोटे, युवा नेतृत्व वैभव बेलोटे, सुरेश वाढवणे, गणेशराव बेलोटे, जगन्नाथ मगर, गोपीचंद गाजरे, तेजस मगर, अक्षय तोडकर, पत्रकार विनोद साळवे यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशोकराव मुळे यांच्या कार्याचा गौरव करत ग्रामविकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना अशोकराव मुळे यांनी हा सन्मान संपूर्ण ग्रामस्थांचा असल्याचे सांगत गावाच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Previous Post

कुमार बिरादार यांच्या जीवनपटावरील ‘सारथी’ पुस्तकाचे प्रकाशन; कार्यपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

पर्यावरण दिनानिमित्त पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाचा प्रेरणादायी शुभारंभ

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
161
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
60
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

पर्यावरण दिनानिमित्त पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाचा प्रेरणादायी शुभारंभ

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In