• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पर्यावरण दिनानिमित्त पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाचा प्रेरणादायी शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

पुणे (सूस), दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सूस येथील पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा शुभारंभ उत्साहपूर्ण आणि पर्यावरणपूरक वातावरणात करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांनी संपूर्ण शाळा परिसर भारावून गेला होता.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या जनजागृती रॅलीने झाली. विद्यार्थ्यांनी हातात पर्यावरणविषयक संदेश देणारे फलक घेऊन परिसरात फेरी काढली. “A Green Planet is a Clean Planet”, “More Plants More Happiness”, “Keep Clean Make Green” आणि “Save Earth Save Future” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीतून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

यानंतर शाळेच्या प्रांगणात उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल तसेच प्रमुख प्राचार्या निर्मल पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नव्याने विकसित करण्यात आलेल्या क्रीडांगणाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले पर्यावरणविषयक पथनाट्य. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रदूषण, वृक्षतोड, प्लास्टिकचा वाढता वापर, जलसंकट आणि पर्यावरणीय असंतुलन यांसारख्या विषयांवर प्रभावी सादरीकरण करून “निसर्ग वाचवा, भविष्य घडवा” हा संदेश दिला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या अभिनयाचे कौतुक केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, स्वच्छता, वृक्षारोपण आणि शाश्वत विकास या विषयांवर भाषणे सादर केली. त्यांच्या विचारांमधून पर्यावरणाबाबतची जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून आली.

मार्गदर्शन करताना प्रमुख प्राचार्या निर्मल पंडित यांनी पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहिजे, असे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

क्रीडांगण उद्घाटनानंतर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि मान्यवरांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. यावेळी “एक वर्ग – एक झाड” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख प्राचार्या निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापिका योगिता ढाणे, पर्यवेक्षक सचिन खोडके, नेहा माळवदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. “निसर्ग वाचवा – भविष्य घडवा” या संदेशासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पर्यावरण दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला.

Previous Post

आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त अशोकराव मुळे यांचा निघोज ग्रामस्थ व मळगंगा ट्रस्टतर्फे सत्कार

Next Post

खटाव तालुक्यात बेकायदेशीर गुटखा व पानमसाला विक्रीला ऊत; कारवाईची मागणी

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
161
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
60
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post
खटाव तालुक्यात बेकायदेशीर गुटखा व पानमसाला विक्रीला ऊत; कारवाईची मागणी

खटाव तालुक्यात बेकायदेशीर गुटखा व पानमसाला विक्रीला ऊत; कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In