• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५०० फळझाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in Blog
0
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५०० फळझाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
0
SHARES
36
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत दि. ५ जून २०२६ रोजी पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. उद्योजक श्री. लक्ष्मण दादा जाधव (झांजवड) यांच्या उदार आर्थिक सहकार्याने स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून पालघर व पुणे येथील NDRF केंद्रांमध्ये एकूण ५०० फळझाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पर्यावरण संरक्षण, हरित विकास आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे NDRF च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. समाजहित आणि पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेल्या या स्तुत्य पुढाकाराबद्दल श्री. लक्ष्मण दादा जाधव यांचे विशेष आभारही व्यक्त करण्यात आले.

यावेळी उद्योजक श्री. सीताराम जाधव (वलवण) यांच्या माध्यमातून लक्ष्मी फुड्सतर्फे विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश दिला.

वृक्षारोपणासोबतच पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि समाजामध्ये हरित विचारांची रुजवण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

स्वराज्य फाउंडेशन, NDRF तसेच सर्व मान्यवरांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

Previous Post

कै. संजय आण्णासो खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

Next Post

गॅंग बदलल्याच्या वादातून तरुणावर हल्ला; श्रीरामपूरात खळबळ

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
गॅंग बदलल्याच्या वादातून तरुणावर हल्ला; श्रीरामपूरात खळबळ

गॅंग बदलल्याच्या वादातून तरुणावर हल्ला; श्रीरामपूरात खळबळ

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In