• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा नदीवरील 110 वर्षे जुना दगडी पूल; इंग्रजकालीन अभियांत्रिकीचा आजही भक्कम वारसा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in Blog
0
वर्धा नदीवरील 110 वर्षे जुना दगडी पूल; इंग्रजकालीन अभियांत्रिकीचा आजही भक्कम वारसा
0
SHARES
48
VIEWS
Ad 1

तिवसा | प्रतिनिधी

अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना जोडणारा वर्धा नदीवरील ऐतिहासिक दगडी पूल आजही इंग्रजकालीन अभियांत्रिकी कौशल्याची साक्ष देत उभा आहे. तब्बल 110 वर्षांचा इतिहास लाभलेल्या या पुलाने अनेक पिढ्यांचा प्रवास सुलभ केला असून आजही तो इतिहासाच्या खुणा जपून ठेवत आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ब्रिटिश राजवटीच्या काळात दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन, दवाखाने, शाळा, मुसाफिरखाने आणि पूल यांसारख्या विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली. त्याच काळात वर्धा नदीवर दगडी पूल उभारण्याची योजना आखण्यात आली.

पूर्वी या ठिकाणी माती-दगडाचा बंधारा होता. त्यावरून पायदळ, घोडदळ आणि बैलगाड्यांची वाहतूक होत असे. मात्र पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर संपर्क पूर्णपणे तुटत असे. नदी पार करण्यासाठी डोंग्यांचा आधार घ्यावा लागत होता, परंतु पुराच्या काळात हा प्रवास अत्यंत धोकादायक ठरत होता.

वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने 1914 साली पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली. या कामासाठी अभियंता जॉर्ज फॅब्रिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे बांधकामासाठी बाहेरील मजूर न आणता परिसरातील गावांमधील लोकांनाच रोजगार देण्यात आला.

भारसोडा, भारवाडी, विष्णूर, परतोडा, खडका, खडकी, वरखेड, तारखेड, जळगाव, चिस्तूर, फत्तेपूर, तळेगाव, आष्टी यांसह अनेक गावांतील महिला व पुरुष या कामात सहभागी झाले. त्या काळात मजुरांना एक रुपया तर बैलगाडीधारकांना दीड रुपया मजुरी दिली जात होती.

पुलासाठी लागणारा दगड वर्धा नदीच्या पात्रातूनच काढण्यात आला. चुनखडी, जवस तेल, डिंक, उडीद डाळ आणि विविध झाडांच्या सालींच्या मिश्रणातून विशेष बांधकाम मसाला तयार करण्यात आला. नदीच्या पात्रात 25 कमानींचा भक्कम पाया घालून पुलाची उभारणी करण्यात आली. दगडांवरील कोरीव कामासाठी पश्चिम बंगालमधील कारागिरांची मदत घेण्यात आली होती.

पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे साडेचार ते पाच वर्षांचा कालावधी लागला. अखेर 1917 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आजही पुलावरील दगडी शिलालेख त्याच्या इतिहासाची साक्ष देतो.

या पुलाच्या बांधकामामुळे परिसरातील दळणवळणाला मोठी चालना मिळाली. त्यानंतर तिवसा येथील रेस्टहाऊस, पोलीस स्टेशन, मुसाफिरखाना, प्राथमिक शाळा आणि पिंगळा नदीवरील पुलासारख्या अनेक सार्वजनिक इमारतींची उभारणी झाली.

1990 नंतर सुरक्षेच्या कारणास्तव या जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर 1989-90 मध्ये पहिला नवीन पूल आणि 2004-05 मध्ये दुसरा पूल बांधण्यात आला. त्यामुळे सध्या वर्धा नदीवर एकूण तीन पूल अस्तित्वात आहेत.

1917 मध्ये उभारलेला हा दगडी पूल आजही पुराच्या प्रचंड तडाख्यांना तोंड देत भक्कमपणे उभा आहे. शतकाहून अधिक काळ उलटल्यानंतरही त्याची मजबुती कायम असल्याने हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग नसून ऐतिहासिक आणि स्थापत्य वारशाचे जिवंत प्रतीक बनला आहे.

— शब्दांकन : प्रा. डॉ. रवी दलाल, तिवसा
— संकलन : विद्रोही अविनाश गोंडाणे

Previous Post

गॅंग बदलल्याच्या वादातून तरुणावर हल्ला; श्रीरामपूरात खळबळ

Next Post

केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; उत्तूर येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; उत्तूर येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न

केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; उत्तूर येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In