• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिघोळमधील जीर्ण वीज यंत्रणा दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in Blog
0
0
SHARES
130
VIEWS
Ad 1

जामखेड | प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील दिघोळ गावातील महावितरणच्या जीर्ण झालेल्या वीज यंत्रणेमुळे नागरिकांना वारंवार अनियमित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

दिघोळ गावातील अनेक वीज खांब व तारा सुमारे ३५ वर्षांपूर्वीचे असून ते अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. अनेक खांब गंजलेले असून वीज तारा कमकुवत झाल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, डीपी जळणे, फ्यूज उडणे, विविध तांत्रिक बिघाड तसेच देखभाल-दुरुस्तीतील विलंब यामुळे गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे घरगुती वापरासह शेती आणि व्यावसायिक कामकाजावरही परिणाम होत आहे.

गावातील वाढत्या वीज वापरामुळे विद्यमान रोहित्रांवर अतिरिक्त ताण येत असून ती वारंवार निकामी होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. महसूल वसुलीच्या दृष्टीने महत्त्वाचे गाव असतानाही आवश्यक सुविधा आणि दुरुस्तीची कामे होत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दिघोळ व माळेवाडी परिसरातील वीज यंत्रणेची प्रभावी दुरुस्ती करण्यात यावी, जीर्ण खांब व तारा तातडीने बदलून आधुनिक केबल वायर टाकण्यात याव्यात, तसेच मंजूर झालेले ३२ केव्ही उपकेंद्र (सबस्टेशन) लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांच्या मते, हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास दिघोळसह परिसरातील पाच ते सहा गावांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठ्याचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

वडाळी परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार; ओढ्याला पूर, वडाळी–श्रीगोंदा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Next Post

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
5
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post
डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In