• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवट बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात पुन्हा धडक कारवाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
किनवट बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात पुन्हा धडक कारवाई
0
SHARES
65
VIEWS
Ad 1
Ad 1

२०० मीटर नो-पार्किंग क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी; वाहनचालकांना नियमांचे मार्गदर्शन

किनवट | दि. १० जून २०२६

राज्य परिवहन महामंडळाच्या महसूलात वाढ करणे, अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालणे आणि प्रवाशांना सुरक्षित व नियमित वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नांदेड विभागाच्या वतीने किनवट बसस्थानक परिसरात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.

RelatedPosts

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

या मोहिमेंतर्गत बसस्थानकापासून २०० मीटरपर्यंतच्या परिसरात नो-पार्किंग झोन तसेच अवैध खाजगी प्रवासी वाहतूक प्रतिबंधक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. दि. १० जून रोजी झालेल्या या कारवाईत मोटार वाहन निरीक्षक निलेश पवार, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संघपाल कदम, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक भागोराव वागतकर, चालक विश्वनाथ बोराटे, किनवट आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक शिलरत्न ढगे, वाहतूक निरीक्षक साईनाथ मुंडे तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक गंगय्या सटलावार यांच्यासह राज्य परिवहन मार्ग वाहतूक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

कारवाईदरम्यान बसस्थानक परिसरातील २०० मीटरच्या हद्दीत उभ्या असलेल्या तसेच प्रवासी वाहतुकीसाठी अनधिकृतपणे वापरल्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणारी अनेक वाहने बसस्थानकाच्या हद्दीबाहेर हलविण्यात आली. त्यामुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत झाली असून प्रवाशांना सुरक्षित वातावरण उपलब्ध झाले आहे.

अधिकाऱ्यांनी यावेळी खाजगी वाहनचालकांशी संवाद साधत अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे कायदेशीर परिणाम, मोटार वाहन कायद्यातील तरतुदी तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या महसूलावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भविष्यात नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

राज्याचे परिवहन मंत्री तसेच परिवहन महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या निर्देशानुसार नांदेड विभागात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष अभियान सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून किनवट येथे ही कारवाई करण्यात आली.

बसस्थानक परिसरातून अनधिकृतपणे प्रवासी उचलणाऱ्या वाहनांमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने अशा वाहनांवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील अनधिकृत वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असून एसटीच्या अधिकृत सेवेला चालना मिळेल, असा विश्वास परिवहन विभागाने व्यक्त केला आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या तपासणी आणि अंमलबजावणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार आहेत.

Ad 1
Previous Post

बजरंग बलीच्या मूर्तीची विटंबना करणारा आरोपी जेरबंद

Next Post

मृत सक्षमच्या प्रेताशी लग्न केल्यानंतर चर्चेत आलेली आंचल घर सोडल्याची चर्चा; ताटे कुटुंबावर दुःखाचे सावट

Related Posts

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
Blog

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026
5
घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल
Blog

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

November 1, 2026
12
माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत
Blog

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

October 31, 2026
26
शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट
Blog

शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट

October 31, 2026
14
पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!
Blog

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

October 30, 2026
13
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव
Blog

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
4
Next Post
मृत सक्षमच्या प्रेताशी लग्न केल्यानंतर चर्चेत आलेली आंचल घर सोडल्याची चर्चा; ताटे कुटुंबावर दुःखाचे सावट

मृत सक्षमच्या प्रेताशी लग्न केल्यानंतर चर्चेत आलेली आंचल घर सोडल्याची चर्चा; ताटे कुटुंबावर दुःखाचे सावट

ताज्या बातम्या

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In