• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागवेच्या मातीतून घडले दोन डॉक्टर; सख्या भाऊ-बहिणीची एमबीबीएसमध्ये प्रथम श्रेणीत यशस्वी भरारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

चंदगड | प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि निसर्गरम्य अशा चंदगड तालुक्यातील नागवे गावाने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित शैक्षणिक सुविधा आणि ग्रामीण जीवनातील आव्हानांवर मात करत नागवे येथील सख्या भाऊ-बहिणीने एमबीबीएस पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून गावासह संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पुणे येथे व्यवसाय करणारे नागवे गावचे सुपुत्र गोविंद दत्ताराम नाडगौडा यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. लहानपणी योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्याने आई-वडिलांचे झालेले निधन त्यांच्या मनाला चटका लावणारे ठरले. याच अनुभवातून ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी योगदान देणारे डॉक्टर घडविण्याचा त्यांनी निर्धार केला होता.

या निर्धाराचे पहिले फळ दोन वर्षांपूर्वी मिळाले. त्यांचा मुलगा डॉ. दर्शन गोविंद नाडगौडा यांनी एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला असून सध्या ते शासकीय रुग्णालयात सेवा बजावत आहेत. आता त्यांची कन्या कु. हरिता गोविंद नाडगौडा हिनेही एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावंडांनी डॉक्टर बनण्याचा मान मिळवल्याने नाडगौडा कुटुंबात आनंदाचे वातावरण असून नागवे गावासाठीही हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

दत्तगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागवे गावात आजही अनेक मूलभूत सुविधांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. डॉ. दर्शन आणि कु. हरिता यांच्या यशामागे त्यांचे अथक परिश्रम, आई सौ. सुजाता गोविंद नाडगौडा यांचे संस्कार आणि वडील गोविंद नाडगौडा यांची जिद्द व दूरदृष्टी यांचा मोठा वाटा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या यशाबद्दल नागवे गाव, चंदगड तालुका तसेच पंचक्रोशीतील नागरिकांकडून नाडगौडा कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षणाच्या बळावर आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, याचा प्रेरणादायी आदर्श या यशस्वी भाऊ-बहिणींनी घालून दिला आहे.

Previous Post

” वाट समतेची” एका संपूर्ण पिढीच्या संघर्षाचा काव्यरुपी दस्तावेज-विद्रोही अविनाश गोंडाणे

Next Post

१ ऑगस्टपासून एसटीतील सवलतींसाठी NCMC कार्ड बंधनकारक

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
१ ऑगस्टपासून एसटीतील सवलतींसाठी NCMC कार्ड बंधनकारक

१ ऑगस्टपासून एसटीतील सवलतींसाठी NCMC कार्ड बंधनकारक

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In