• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल भरलेल्या ट्रकला आग, चालक-वाहक थोडक्यात बचावले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल भरलेल्या ट्रकला आग, चालक-वाहक थोडक्यात बचावले
0
SHARES
96
VIEWS
Ad 1

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर-चोपडा महामार्गावरील सावेर गावाजवळील जय पेट्रोल पंप परिसरात आज पहाटे भीषण अपघात घडला. केमिकलने भरलेला ट्रक उलटल्यानंतर त्याला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखत वेळेत उडी मारल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास केमिकलने भरलेला ट्रक चोपड्याकडून शिरपूरच्या दिशेने जात होता. सावेर गावाजवळील जय पेट्रोल पंप परिसरात अज्ञात वाहनाने दिलेल्या हुलकावणीमुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला आणि काही क्षणांतच त्याला भीषण आग लागली.

आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. घटनेनंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच थाळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. या दुर्घटनेत ट्रकसह केमिकलच्या मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अज्ञात वाहनाच्या हुलकावणीमुळे अपघात झाला का, याचा तपास थाळनेर पोलीस करीत आहेत. सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Previous Post

जांभळांचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? पारंपरिक ज्ञानाला विज्ञानाची जोड

Next Post

महागाईविरोधात काँग्रेसचे कांदिवलीत आंदोलन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

महागाईविरोधात काँग्रेसचे कांदिवलीत आंदोलन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In