• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यांत्रिक भात लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल; खरवंद येथे प्रो-ट्रे पेरणीचे प्रात्यक्षिक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 14, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पालघर | प्रतिनिधी :

जव्हार तालुक्यातील खरवंद येथील राऊत फार्महाऊसवर रविवारी (दि. 14 जून) प्रो-ट्रे आधारित यांत्रिक भात लागवडीसाठी ट्रेमध्ये भात पेरणीचे प्रात्यक्षिक उत्साहात पार पडले. भात शेतीतील वाढता उत्पादन खर्च कमी करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

यांत्रिक भात लागवड पद्धतीमध्ये भाताची रोपे विशेष प्रो-ट्रेमध्ये तयार केली जातात. त्यानंतर भात लावणी यंत्राच्या साहाय्याने शेतात लागवड केली जाते. या पद्धतीमुळे पारंपरिक लागवडीतील राब करणे, रोपे उपटणे आणि पुनर्लागवडीसाठी लागणारा मोठा मजुरी खर्च वाचतो. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात लक्षणीय बचत होत असून शेती अधिक किफायतशीर बनत आहे.

खरवंद येथील प्रगतशील शेतकरी सदाशिव राऊत आणि बाळकृष्ण चौधरी हे गेल्या चार वर्षांपासून यांत्रिक भात लागवडीचा यशस्वी अवलंब करत आहेत. या तंत्रज्ञानामुळे मजुरी खर्चात बचत, वेळेची बचत आणि कामात सुलभता मिळाल्याचा अनुभव त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडला.

या प्रात्यक्षिकावेळी कोसबाड येथील Krishi Vigyan Kendra Kosbad चे संशोधक भरत कुशारे यांनी शेतकऱ्यांना यांत्रिक भात लागवडीचे फायदे, प्रो-ट्रे व्यवस्थापन आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना प्रो-ट्रे तसेच भात लावणी यंत्राची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, विनवळ येथील शेतकरी लता मोरघा आणि बबन मोरघा यांनी यंदा प्रथमच प्रो-ट्रे यांत्रिक भात लागवडीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी या प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी अशा प्रात्यक्षिकांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये यांत्रिक भात लागवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून या तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

Previous Post

गोदावरी नदीत बुडून तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू; मोहोळा गावावर शोककळा

Next Post

संतनगरी शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजींचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा; भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
15
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
9
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
21
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
23
Next Post

संतनगरी शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजींचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा; भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In