• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुमार विद्या मंदिर क्रमांक ३ ची पीएम श्री योजनेसाठी निवड; १३ नवीन वर्गखोल्यांसाठी २.०५ कोटींचा निधी मंजूर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील कुमार विद्या मंदिर क्रमांक ३ या शाळेची केंद्र शासनाच्या पीएम श्री योजनेसाठी निवड झाली असून, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल जिल्हा परिषद शिक्षण समितीकडून विशेष कौतुक करण्यात आले. तसेच शाळेसाठी १३ नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी २ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जिल्हा परिषद कोल्हापूरच्या शिक्षण समितीने वार्षिक आढावा बैठकीनिमित्त शाळेला भेट दिली. यावेळी शाळेची वाढती विद्यार्थी संख्या, शैक्षणिक गुणवत्ता आणि विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. शाळेच्या प्रगतीबद्दल समिती सदस्यांनी समाधान व्यक्त करत शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

बैठकीच्या प्रारंभी मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांनी मान्यवरांचे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. एकेकाळी कमी पटसंख्येमुळे अडचणीत असलेल्या शाळेने आज केलेली उल्लेखनीय प्रगती सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

शाळेतील वाढत्या विद्यार्थ्यांमुळे वर्गखोल्यांची कमतरता निर्माण झाली होती. याची दखल घेत शिक्षण समितीने १३ नवीन वर्गखोल्यांसाठी २ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. भविष्यात शाळेच्या विकासासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त निधीही उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण समितीच्या सभापती शीतल यादव यांनी दिले.

दरम्यान, “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या राज्यस्तरीय स्पर्धेत विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकांनी परिधान केलेला एकसमान ड्रेस कोड आणि शिस्तबद्ध वातावरण हे बैठकीचे विशेष आकर्षण ठरले.

यावेळी शिक्षण समितीच्या सभापती शीतल यादव, सदस्य रेखा मुगडे, सानिका आवाडे, स्नेहल वेल्हाळ, उत्तरा शिंदे, शुभांगी कुंभार, अमरसिंह चव्हाण, एकनाथ पाटील, भगवान पाटील तसेच जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्य प्रशांत शहापुरे उपस्थित होते.

याशिवाय प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडकर, सुवर्णा सावंत, म्हेत्रे, उपशिक्षणाधिकारी शशिकांत बडे, काकडे, विस्तार अधिकारी दबडे, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व शिक्षा अभियानाचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेचे अभियंता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या या यशाबद्दल आणि शिक्षण समितीने दाखविलेल्या विश्वासाबद्दल पालक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांकडून शाळा व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा : डॉ. देवराव होळी

Next Post

लोक जनशक्ती पार्टीची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न; संघटनात्मक बांधणीवर भर

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
38
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
22
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
96
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
204
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
68
Next Post

लोक जनशक्ती पार्टीची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न; संघटनात्मक बांधणीवर भर

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In