• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

टी.सी.साठी पैसे मागणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही – कैलास सोमुसे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
49
VIEWS
Ad 1

जळकोट | प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना शाळेतून टी.सी. (Transfer Certificate) देण्यासाठी पैसे मागणे किंवा टी.सी. देण्यास टाळाटाळ करणे हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर घाला असून अशा शाळांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे जळकोट तालुकाध्यक्ष कैलास सोमुसे यांनी दिला आहे.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

कैलास सोमुसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात अनेक विद्यार्थी व पालकांकडून टी.सी. देण्यासाठी अवैधरित्या पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. काही शाळांकडून विविध कारणे सांगत विद्यार्थ्यांना टी.सी. देण्यास नकार दिला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.

हा प्रकार अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या संबंधित शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय टी.सी. उपलब्ध करून देणे ही शाळांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

लातूर जिल्ह्यातील कोणत्याही शाळेने टी.सी. देण्यासाठी पैसे मागितल्यास किंवा टी.सी. देण्यास नकार दिल्यास विद्यार्थी व पालकांनी संबंधित शाळेचे नाव, मुख्याध्यापकांचे नाव आणि संपूर्ण माहिती मोबाईल क्रमांक 8459355911 वर संपर्क साधून कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल तसेच संबंधित शाळांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जाईल, असे सोमुसे यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी लढा सुरूच राहील आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. तसेच विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन अशा गैरप्रकारांविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Previous Post

संविधानाच्या चौकटीत काम केल्यास भारतीय संविधानाची खरी ताकद दिसून येईल – माणिकराव बनसोडे

Next Post

माळीनगरच्या प्राथमिक शाळेत उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’ संपन्न

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
3
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
5
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
23
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
14
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
9
Next Post

माळीनगरच्या प्राथमिक शाळेत उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’ संपन्न

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In