• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संविधानाच्या चौकटीत काम केल्यास भारतीय संविधानाची खरी ताकद दिसून येईल – माणिकराव बनसोडे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

परळी | प्रतिनिधी

देशातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम केल्यास संविधानाची खरी ताकद जनतेसमोर दिसून येईल, असे प्रतिपादन भारतीय दलित पँथरचे परळी तालुकाध्यक्ष माणिकराव बनसोडे यांनी केले आहे.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात बनसोडे यांनी सांगितले की, संविधानिक संस्थांनी भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली पाहिजे. कर्तव्यच्युती करणाऱ्या किंवा भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी. देशात सध्या पेपरफुटी प्रकरणे, गॅस, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती यांसारख्या समस्यांमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. मात्र या प्रश्नांवर अनेक लोकप्रतिनिधी मौन बाळगत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कामगार, शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात सापडले असून महागाई कमी झाल्याशिवाय सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. निवडणुका जवळ आल्या कीच जनतेची आठवण येते, अशी टीका करत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी त्यांनी संविधानाबाबतही आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “दोष संविधानाचा नसतो, तर ते चालवणाऱ्यांच्या नीयत आणि कार्यपद्धतीचा असतो. जेव्हा तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी संविधानाच्या चौकटीत राहून निर्भीडपणे काम करतात, तेव्हा संविधानाची खरी ताकद दिसून येते.”

सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध भेसळ, गुटखा तसेच विविध नियमबाह्य व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांचा आदर्श घेऊन निर्भीडपणे कर्तव्य बजावावे तसेच विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माणिकराव बनसोडे यांनी केले आहे.

Previous Post

व्हॉलंटरी शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांचे अनोख्या उपक्रमांनी स्वागत

Next Post

टी.सी.साठी पैसे मागणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही – कैलास सोमुसे

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
3
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
5
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
23
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
14
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
9
Next Post

टी.सी.साठी पैसे मागणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही – कैलास सोमुसे

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In