• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

मुलचेरा | प्रतिनिधी : मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना विविध शासकीय व कायदेशीर कामांसाठी आवश्यक स्टॅम्प खरेदी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत असून वेळ आणि पैशांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.

तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांना स्टॅम्प खरेदीसाठी चामोर्शी, अहेरी, गडचिरोली, गोंडपिपरी आदी ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे प्रवास खर्च वाढत असून महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः जमीन व्यवहार, प्रतिज्ञापत्रे, शासकीय कागदपत्रे आणि विविध करारनाम्यांसाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या समस्येची दखल घेत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना निवेदन सादर केले. निवेदनात मुलचेरा तालुक्यात तातडीने अधिकृत स्टॅम्प विक्रेत्याची नियुक्ती करावी किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, युवा तालुकाध्यक्ष कालिदास कुसनाके, उपाध्यक्ष संदीप तोरे, संघटक महेंद्र आत्राम, सोशल मीडिया प्रमुख केजीकराव आरके, सहसचिव राकेश मरापे, कार्याध्यक्ष काशिनाथ मडावी, चामोर्शी तालुका अध्यक्ष सुमित कुंभरे, ॲड. गिरीश झोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

Next Post

ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत; शिरूर नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत; शिरूर नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In