अंदरसुल | प्रतिनिधी :
राधिका इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसुल येथे राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याची, त्यागाची, दूरदृष्टीची आणि संस्कारमूल्यांची माहिती देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात जिजाऊंचे योगदान किती महान होते, याविषयी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन राष्ट्रप्रेम, शिस्त आणि सदाचार जोपासण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे, मनोगते आणि घोषवाक्यांद्वारे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले. कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

