• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इचलकरंजी ते शिरोळ पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील उपसा बंदी उठवावी; शेतकऱ्यांचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

जलसंधारण विभागांतर्गत शिरोळ उपविभागीय पाटबंधारे उपविभाग, शिरोळ-कुरुंदवाड शाखेकडून पंचगंगा नदीवरील इचलकरंजी ते शिरोळ बंधाऱ्यादरम्यान लागू करण्यात आलेली उपसा बंदी तातडीने उठवावी, अशी मागणी पंचगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रकाश येसने यांना निवेदन सादर करण्यात आले.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगा नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले असून ते पिण्यायोग्य राहिलेले नाही. बहुतांश गावांमध्ये नदीचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नसून त्याऐवजी पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नदीतील उपलब्ध पाण्याचा वापर मुख्यत्वे शेतीसाठीच केला जात आहे.

मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता इचलकरंजी ते शिरोळ बंधाऱ्यादरम्यान अचानक उपसा बंदी लागू करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सध्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून वाढत्या उन्हामुळे पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारे साहित्य व तयारी करून ठेवली असून, अशा परिस्थितीत सिंचनासाठी पाणी न मिळाल्यास पिके जळून जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी शेतकरी नेते धनाजी चूडमुंगे आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली. “प्रोसेस व सायझिंग उद्योगांचा पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र शेतीसाठी पाणी बंद केले जात आहे. पंचगंगेतील सांडपाणी पुढे कृष्णा नदीत मिसळत असून त्याचा उपयोग पिण्यासाठी कोणीही करत नाही. त्यामुळे हे पाणी शेतीसाठी वापरण्यास परवानगी द्यावी,” अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पंचगंगा नदीवरील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यरत असल्या तरी नदीचे पाणी रासायनिक सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. जलसंधारण विभागाच्या परिपत्रकानुसार धरणातील पिण्याच्या पाण्याचा साठा वगळता इतर वापरांवर बंदी घालण्याचा नियम आहे. मात्र पंचगंगा नदीचे पाणी आधीच पिण्यास अयोग्य असल्याने शेतीसाठी उपसा बंदी लावणे अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उपसा बंदीमुळे शेतीचे नियोजन विस्कळीत होणार असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इचलकरंजी ते शिरोळ बंधाऱ्यादरम्यान लागू करण्यात आलेली उपसा बंदी तातडीने हटवावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

यावेळी धनाजी चूडमुंगे, दिपक पाटील, प्रभाकर बंडगर, बंडू बरगाले, राकेश जगदाळे, गोपाळ चव्हाण, रावसाहेब गवळी, सर्जेराव बाबर आदी शेतकरी उपस्थित होते.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

हतनूर टोलनाक्यावर लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कारसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Next Post

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
163
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
61
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In