• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
63
VIEWS
Ad 1

माहिती अधिकार अर्जासोबत आता ओळखपत्र अनिवार्य

राज्यातील माहिती अधिकार प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अर्जांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्य सरकारने ‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६’ संपूर्ण राज्यात लागू केला आहे. या नव्या नियमांमुळे माहिती मागविण्याच्या प्रक्रियेत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून अर्जदारांसाठी काही कडक अटी व नियम लागू करण्यात आले आहेत.

नव्या नियमांनुसार, आता माहिती अधिकार (आरटीआय) अर्ज करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अर्जासोबत स्वतःचे वैध ओळखपत्र अथवा नागरिकत्वाचा पुरावा जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. ओळखपत्राशिवाय सादर करण्यात आलेले अर्ज फेटाळले जाऊ शकतात.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

माहिती अधिकार अर्जांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी शासनाने अर्जाच्या स्वरूपावरही मर्यादा घातल्या आहेत. आता एका अर्जात केवळ एकाच विषयासंबंधी माहिती मागता येणार आहे. तसेच अर्जातील मजकूर १५० शब्दांच्या मर्यादेत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवीन नियमावलीनुसार माहिती अधिकार शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यापुढे अर्जदारांना विहित नमुन्यात अर्ज सादर करताना ₹३० शुल्क भरावे लागणार आहे. तसेच छायाप्रती (झेरॉक्स), स्कॅन किंवा डिजिटल प्रतींच्या प्रत्येक पृष्ठासाठी ₹५ शुल्क आकारले जाणार आहे.

शासनाच्या संकेतस्थळावर किंवा सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली माहिती पुन्हा देण्याचे बंधन माहिती अधिकाऱ्यांवर राहणार नाही. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असलेली माहिती मागणारे अर्ज संबंधित अधिकारी थेट नाकारू शकतील.

सार्वजनिक हित सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदारावर

नव्या नियमांमध्ये वैयक्तिक किंवा खाजगी बाबींशी संबंधित माहितीबाबतही स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. जर मागितलेली माहिती सार्वजनिक हिताशी संबंधित नसल्याचे आढळले, तर ती माहिती नाकारण्याचा अधिकार प्रशासनाला राहणार आहे. विशेष म्हणजे, संबंधित माहिती सार्वजनिक हितासाठी आवश्यक कशी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता अर्जदारावर टाकण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांकडून नाराजी

दरम्यान, शासनाच्या या नव्या नियमांबाबत माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते आणि सजग नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शुल्कवाढ, १५० शब्दांची मर्यादा आणि ओळखपत्र सक्तीमुळे सामान्य नागरिकांसाठी माहिती मिळविण्याची प्रक्रिया अधिक कठीण होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तसेच या बदलांमुळे लोकशाहीतील पारदर्शकतेवर परिणाम होण्याची भीतीही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Tags: Sudhir Kene
Previous Post

अमरावती जिल्ह्यातील सर्व सीबीएसई व राज्य मंडळाच्या शाळा ३० जूनपासूनच सुरू होणार

Next Post

जिल्ह्यात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
12
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post

जिल्ह्यात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In