• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विटकरांवचं मौन, संजय जाधवांच्या प्रवेशावरून मान हलवून इशारा; महायुतीतील ‘दरबारी’ चर्चांना उधाण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | परभणी

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. निवडणुकीनंतर पाथरी येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी विविध नेत्यांचे आभार मानले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटकर यांचे नाव टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

RelatedPosts

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पत्रकार परिषदेत सईद खान यांनी मंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपुडकर, काँग्रेस नेते आमदार सतीश वानखेडे, दोन्ही जिल्ह्यातील आमदार-माजी आमदार, महायुतीतील नेते तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. मात्र, महायुतीतील घटक पक्षाचे महत्त्वाचे नेते असलेल्या आमदार राजेश विटकर यांचा उल्लेख त्यांनी टाळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

याबाबत पत्रकारांनी थेट प्रश्न विचारल्यानंतरही सईद खान यांनी मौन बाळगले. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यान खासदार संजय जाधव यांच्या संभाव्य शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर सईद खान यांनी थेट भाष्य न करता मान हलवत सकारात्मक संकेत दिल्याचे उपस्थितांनी सांगितले. या हालचालीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला आहे. एका बाजूला शिवसेना (शिंदे गट) तर दुसऱ्या बाजूला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मित्रपक्ष अशी लढत झाली. निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून, महायुतीकडे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

आता २३ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत नेमका कोण बाजी मारतो, याकडे संपूर्ण परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

बनावट पावत्या फाडून शासनाची फसवणूक?; आडगावच्या ग्रामसेवकाविरोधात संताप

Next Post

खा. संजय जाधव यांची शिवसेनेत घरवापसी; पक्षाला नवसंजीवनी मिळणार : सईद खान

Related Posts

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
15
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
182
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
63
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
8
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
Next Post

खा. संजय जाधव यांची शिवसेनेत घरवापसी; पक्षाला नवसंजीवनी मिळणार : सईद खान

ताज्या बातम्या

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

September 23, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In