• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग बेमुदत उपोषण; शेतकरी गुरेढोरे घेऊन आंदोलनात सहभागी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
49
VIEWS
Ad 1

मारेगाव प्रतिनिधी

मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथील उंबरे यांनी विविध मागण्यांसाठी थेट तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला आता सात दिवस उलटले असून, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

या उपोषणाचे नेतृत्व राजू निमसटकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, करणवाडी ते खडकी, खडकी ते घोरदडा आणि घोरदडा ते नरसाळा या शिवदुरा पांदण रस्त्याची तातडीने दुरुस्ती व मार्ग मोकळा करण्यात यावा, ही मुख्य मागणी करण्यात आली आहे.

उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही अधिकारी प्रत्यक्ष पाहणी न करता कार्यालयात बसूनच निर्णय घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, आंदोलनकर्त्यांनी आपल्या गुरेढोऱ्यांसह तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांसोबत गाय, वासरे आणि बैलजोडीही आंदोलनस्थळी बसल्याचे चित्र पाहायला मिळत असून, या आंदोलनाने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

“एकीकडे अन्नत्याग करून आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे जनावरेही उपोषणस्थळी आहेत; मात्र प्रशासनाला याची दखल घ्यावीशी वाटत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

उपोषणकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला असता, “जो रस्ता अडवत असेल त्याच्याविरोधात तक्रार द्या,” असे उत्तर मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, वाद वाढवण्यापेक्षा प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

तालुक्यातील अनेक नागरिकांनी या प्रश्नावर प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून उपोषणकर्त्यांच्या मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.

Tags: Pranay Khaire
Previous Post

बोपगाव येथे नवनाथ देवस्थान पंच कमेटी ट्रस्टच्या वतीने शालेय वह्यांचे वाटप

Next Post

महापुरुषांना अभिवादन करत न्यायाच्या लढ्याला प्रारंभ

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
160
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
60
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

महापुरुषांना अभिवादन करत न्यायाच्या लढ्याला प्रारंभ

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In