• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाडमध्ये २४ जून रोजी २९ व्या संगीत महोत्सवाचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :-

कुरुंदवाड : मरहूम भूगंधर्व रहिमत खाँ आणि पं. विष्णूशास्त्री दिगंबर पलूसकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात येणारा २९ वा संगीत महोत्सव बुधवार, दि. २४ जून रोजी उत्साहात संपन्न होणार आहे. मरहूम भूगंधर्व रहिमत खाँ व पं. विष्णूशास्त्री दिगंबर पलूसकर स्मृती समितीच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

कुरुंदवाड संस्थानकालीन राजदरबारी गायक मरहूम भूगंधर्व रहिमत खाँ तसेच भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील मान्यवर पं. विष्णूशास्त्री दिगंबर पलूसकर यांच्या स्मृती दिनानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून हा संगीत महोत्सव आयोजित केला जात आहे.

यंदाचा २९ वा संगीत महोत्सव बुधवार, दि. २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता येथील गणपती मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाच्या पहिल्या सत्रात स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांच्या स्वरांजलीतून भक्तीगीत, भावगीत, अभंग आणि नाट्यगीतांचा सुरेल कार्यक्रम सादर होणार आहे.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात रात्री ९.३० वाजता कोल्हापूरचे सुप्रसिद्ध गायक रुद्रनाथ कुलकर्णी यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना तबल्यावर महेश देसाई (कोल्हापूर) तर संवादिनीवर स्वरूप दिवाण (कोल्हापूर) यांची साथसंगत लाभणार आहे.

संगीत महोत्सव समितीचे अध्यक्ष अरुण काका जोशी, उपाध्यक्ष डॉ. डी. पी. कुलकर्णी आणि दत्तात्रय कुलकर्णी यांनी ही माहिती दिली असून, कुरुंदवाड परिसरातील संगीतप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

सिन्नर : वावी भागातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे, छत्री व स्कूल बॅग वाटप

Next Post

कै. आप्पासाहेब बाबू आवटी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त “बाप… आधार जीवनाचा” काव्यांजली कार्यक्रम

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
167
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
61
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

कै. आप्पासाहेब बाबू आवटी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त “बाप... आधार जीवनाचा” काव्यांजली कार्यक्रम

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In