• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘राज्यमाता गोमाता गोसंवाद यात्रेत नागरिक, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे’ – रामचंद्र डांगे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :-

कुरुंदवाड : महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि राज्य पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली “राज्यमाता गोमाता गोसंवाद यात्रा” येत्या २७ जून रोजी कोल्हापूर येथे दाखल होणार असून, जिल्ह्यातील गोप्रेमी, गोशाळा चालक, गोसेवक, शेतकरी तसेच सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रामचंद्र डांगे यांनी केले आहे.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

देशी गोवंशाचे संवर्धन, गोशाळांचे सक्षमीकरण, गोसेवेबाबत जनजागृती तसेच गोआधारित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही राज्यव्यापी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. २३ जूनपासून सुरू होणारी ही यात्रा राज्यातील विविध जिल्ह्यांतून प्रवास करत ५ जुलै रोजी नागपूर येथे समारोपाला पोहोचणार आहे.

यात्रेदरम्यान गोसंवर्धन, गोशाळा व्यवस्थापन, गोबर व गोमूत्रावर आधारित मूल्यवर्धित उत्पादने, सेंद्रिय शेती, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना तसेच गोशाळांच्या आर्थिक स्वावलंबनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे गोशाळा चालक, शेतकरी आणि गोसेवकांना तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे.

कोल्हापूर येथे २७ जून रोजी सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या राज्यमाता गोमाता संवाद कार्यक्रमात राज्यभरातील गोसेवक, गोरक्षक, गोशाळा प्रतिनिधी आणि पशुपालक सहभागी होणार असून, गोसंवर्धन क्षेत्रातील विविध अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गोवंश संवर्धन आणि नैसर्गिक शेती यांची सांगड घालणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे रामचंद्र डांगे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना रामचंद्र डांगे म्हणाले, “गोमाता ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. गोमाता म्हणजे कामधेनू. गोसंवर्धन आणि गोसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी अशा संवाद यात्रांची आवश्यकता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गोशाळा चालक, गोसेवक, शेतकरी, गोप्रेमी तसेच नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे.”

Tags: Darikant Kolekar
Previous Post

कै. आप्पासाहेब बाबू आवटी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त “बाप… आधार जीवनाचा” काव्यांजली कार्यक्रम

Next Post

अल्पवयीन मुलांकडून सर्रास दुचाकी चालविणे; पालकांच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
155
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
59
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

अल्पवयीन मुलांकडून सर्रास दुचाकी चालविणे; पालकांच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In