• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा धक्का; फौजदारी कारवाईपासून संरक्षणास तूर्त नकार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

कोल्हापूर : बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवल्याचा आरोप असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे भाजप सदस्य महेश (दरगोंडा) बसगोंडा पाटील यांना उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या प्रतिकूल निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्या. देशपांडे यांच्या खंडपीठाने महेश पाटील यांच्यावरील संभाव्य फौजदारी कारवाईला स्थगिती देण्यास किंवा संरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

खंडपीठाने घाईगडबडीत कोणताही दिलासा देण्यास अनुकूलता दर्शवली नाही असून पुढील आठवड्यात सुनावणी ठेवण्यात आली आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

राहुल आवाडे गटाचे समर्थक मानले जाणारे महेश पाटील यांनी पट्टणकोडोली मतदारसंघातून अनुसूचित जाती (लिंगदेरू) प्रवर्गातून जिल्हा परिषद निवडणूक जिंकली होती. मात्र ते मूळचे लिंगायत समाजातील असून त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार पुरुषोत्तम भुजिंगे आणि तुषार बाणदार यांनी केली होती. त्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सुनावणी घेत महेश पाटील यांचा ‘लिंगदेरू’ जातीचा दाखला अवैध ठरवला होता.

या निर्णयाविरोधात आणि संभाव्य फौजदारी कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी महेश पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलांनी जातवैधता प्रमाणपत्र कायदेशीर प्रक्रियेनंतरच मिळाल्याचा दावा करत संभाव्य अटक किंवा एफआयआरपासून संरक्षण देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत, जात पडताळणी समितीच्या आदेशातील गंभीर निष्कर्षांचा उल्लेख केला. समितीच्या अहवालात बोगस कागदपत्रांचा आधार घेतल्याचे नमूद असल्याने न्यायालय अशा प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

या निर्णयामुळे महेश पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर फसवणूक व बनावटगिरीचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून आवाडे गटालाही राजकीयदृष्ट्या धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Previous Post

वाळुंजनगर येथे शेतकऱ्यांना बाजरी बियाण्यांचे वाटप

Next Post

पोहर नदीवरील जुन्या पुलाला तात्काळ कठडे बसवावेत; काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
27
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
102
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

पोहर नदीवरील जुन्या पुलाला तात्काळ कठडे बसवावेत; काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In