• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेलूत राष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त महिलांना शासकीय योजना, रोजगार व आर्थिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

२३ जून ‘जागतिक एकल महिला दिन’ उत्साहात साजरा

सेलू | प्रतिनिधी

महिला व बाल विकास विभाग, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि नगर परिषद सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकल महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासह रोजगार आणि शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती शीला रामेश्वर काजळे या होत्या. सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, तर विविध बँकांचे अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक परभणीचे व्यवस्थापक रामचंद्र अकोलवार आणि भारतीय स्टेट बँकेच्या वित्तीय साक्षरता विभागाचे सुनील हतेकर यांनी महिलांना विविध बँकिंग सेवा, विमा योजना, कर्ज योजना तसेच आर्थिक सक्षमीकरणासाठी उपलब्ध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा समन्वयक सचिन चव्हाण आणि कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी मदन शिंदे यांनी रोजगाराच्या विविध संधी व शासकीय योजनांची माहिती उपस्थित महिलांना दिली. महिलांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध योजनांविषयी माहिती जाणून घेतली.

सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी महिलांना स्वावलंबनासाठी शासकीय योजनांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. शीला रामेश्वर काजळे यांनी महिलांना योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याधिकारी भगवान चव्हाण यांनी केले. नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी शीतल सोळंके यांनी दिली. सूत्रसंचालन कर निरीक्षक अंकुश जाधव यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद दायमा, धनंजय सिंह बायस, दिनेश टाक, महेंद्र ढाले, कृष्णा कदम, आनंद काबरा, नागेश चिखलीकर, जितू अजीम शेख, शिल्पा मगर, शारदा इंगळे, विद्या महाडिक तसेच नगर परिषदेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous Post

जळकोट तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसाने शेतीचे मोठे नुकसान; पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी

Next Post

लांबलेला पाऊस एकदाचा सुरू; कर्जत तालुक्यात शेतीच्या कामांना वेग

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
27
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
102
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

लांबलेला पाऊस एकदाचा सुरू; कर्जत तालुक्यात शेतीच्या कामांना वेग

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In