• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गरजू अस्थिव्यंग बांधवांनी कृत्रिम अवयव वितरण शिबिराचा लाभ घ्यावा – गट शिक्षणाधिकारी निळकंठ चेटले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

२७ जून रोजी किनवट येथे शिबिराचे आयोजन

किनवट | प्रतिनिधी

किनवट येथील जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूलमध्ये शनिवार, २७ जून रोजी अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त गरजू दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिविक्षाधीन उपशिक्षणाधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी निळकंठ चेटले यांनी केले आहे.

RelatedPosts

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आर. ट्रस्ट, मध्यप्रदेश आणि ALIMCO, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑन द स्पॉट” मोजमाप व तात्काळ वितरणासाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात-पाय, कॅलिपर्स तसेच इतर आवश्यक साहित्याचे मोजमाप घेऊन तात्काळ वितरण करण्यात येणार आहे.

शिबिरात टोंगळ्याखालील व वरच्या भागासाठी कृत्रिम पाय, मनगट किंवा खांद्यापासून कट झालेल्यांसाठी कृत्रिम हात, पायाचे सिलम (प्लास्टिक पट्टा), कॅलिपर्स तसेच दैनंदिन वापरासाठी स्पोर्ट्स बूट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हे शिबिर शनिवार, २७ जून २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूल, किनवट येथे होणार आहे.

दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नांदेडचे सहाय्यक आयुक्त अवधूत गंजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक प्रदीप कांबळे, महादेव वायकुळे, शेख अन्सार, अंकुश आडेराव आणि व्यवस्थापकीय अधीक्षक प्रमोद बागवाले हे शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

या शिबिरासाठी येताना लाभार्थींनी आधार कार्ड, रेशन कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि UDID कार्ड ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहनही निळकंठ चेटले यांनी केले आहे.

Previous Post

लांबलेला पाऊस एकदाचा सुरू; कर्जत तालुक्यात शेतीच्या कामांना वेग

Next Post

बिबट्याचा गावात शिरून जनावरांवर हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Related Posts

Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
5
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
0
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
0
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
0
घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका
Blog

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

September 28, 2026
2
Blog

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

September 28, 2026
6
Next Post

बिबट्याचा गावात शिरून जनावरांवर हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In