• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुक्ताईनगर परिवर्तन चौकातील रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 25, 2026
in Blog
0
0
SHARES
58
VIEWS
Ad 1

मुक्ताईनगर प्रतिनिधी :
मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौक, डेपो समोरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रस्त्यावरील खड्डे आणि साचणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये चिखल आणि पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनधारक, पादचारी आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने पालकांमध्येही संताप व्यक्त होत आहे.

RelatedPosts

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या समस्येबाबत माहिती देण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. रस्त्यावरील पाणी आणि खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

“शाळकरी विद्यार्थ्यांना हा त्रास अजून किती दिवस सहन करावा लागणार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तात्काळ पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Previous Post

महावितरणचा मनमानी कारभार! झाडांच्या फांद्या तोडल्या पण रस्ता साफ करायला मुहूर्त मिळेना; शहादेकर आक्रमक

Next Post

मुक्ताईनगर तालुक्यात पावसाचा हाहाकार; कर्की गाव जलमय, पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था

Related Posts

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
0
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
1
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
5
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
21
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
5
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
12
Next Post

मुक्ताईनगर तालुक्यात पावसाचा हाहाकार; कर्की गाव जलमय, पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था

ताज्या बातम्या

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In