• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

कोल्हापूर : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि कोकणच्या वेशीवर वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील छोटेसे पाटगाव आता राज्यभर नव्हे तर जगभर चर्चेत आले आहे. नैसर्गिक पद्धतीने मध उत्पादन करणारे हे गाव ‘मधाचे गाव’ म्हणून आधीच प्रसिद्ध होते. आता राज्याच्या इयत्ता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात ‘The Honey Village’ या धड्याच्या माध्यमातून पाटगावचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांना या गावाच्या गोड यशाची ओळख होणार आहे.

RelatedPosts

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

घनदाट जंगल, कारवी, सूर्यफूल आणि जांभूळ फुलांचा सुगंध यामुळे या परिसरात मधमाशांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. याच नैसर्गिक संपत्तीच्या जोरावर गावात दरवर्षी सुमारे दहा टन मधाचे उत्पादन घेतले जाते. पाटगावचा मध देशासह विदेशातही पोहोचला असून गावाला विशेष ओळख मिळाली आहे.

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने यंदा दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. त्यात पाटगावच्या ‘मध गाव’ संकल्पनेचा समावेश करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मधाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण उद्योजकतेचा आदर्श अभ्यासता येणार आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना गावच्या सरपंच दीप्ती राऊळ यांनी सांगितले की, “पाटगावातील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून मधमाशी पालन आणि मध संकलनाचे काम करत आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे गावाला नवी ओळख मिळाली. आता पाठ्यपुस्तकातून राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या गावाची माहिती पोहोचणार असल्याने आम्हाला अभिमान वाटतो.”

मधाचे औषधी गुणधर्म लक्षात घेता मानवी आरोग्यात त्याला विशेष महत्त्व आहे. पचनक्रिया सुधारण्यापासून ते विविध आजारांवर उपयोगी ठरणाऱ्या मधाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावे, या उद्देशाने हा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.

दरम्यान, पाटगावसह शिवडाव, अंतुरली आणि मटगाव परिसरातील ग्रामस्थ पारंपरिक पद्धतीने मध संकलनाचे काम करतात. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळ, जिल्हा नियोजन समिती आणि नाबार्ड यांच्या सहकार्याने ‘पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी’ स्थापन करण्यात आली आहे. मधमाशी पालन, प्रशिक्षण, प्रक्रिया आणि विपणन यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

‘मध पर्यटन’ संकल्पनेमुळे पर्यटकही मोठ्या संख्येने गावाला भेट देत असून, आता पाठ्यपुस्तकातील समावेशामुळे पाटगावची ओळख आणखी व्यापक होणार आहे.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

जळकोट शहरात मोहरम उत्सव उत्साहात; सर्वधर्मीय बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

Related Posts

ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
11
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
8
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
4
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
4
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
39
समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
8
Next Post

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

ताज्या बातम्या

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In