• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

मुंबई : राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, इटरीज तसेच अन्न प्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

RelatedPosts

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

राज्यात नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत सर्व खाद्य व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नोंदणी करून नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंढे यांनी सांगितले की, ग्राहकांना पिण्यायोग्य व सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. हॉटेल्सनी यासंदर्भातील स्पष्ट सूचना फलक दर्शनी भागात लावावेत. ग्राहकांनी विशेष मागणी केल्यासच बाटलीबंद पाणी द्यावे. अन्यथा ग्राहकांसमोर थेट पाण्याच्या बाटल्या ठेवण्याची सक्ती करता येणार नाही.

तसेच ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी, द्रव साबण, टॉवेल आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अन्न व औषध प्रशासनाने अलीकडे घेतलेल्या तपासण्यांमध्ये अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्याचेही मुंढे यांनी सांगितले. अस्वच्छ वातावरणात अन्न तयार करणे, वारंवार वापरलेल्या तेलात पदार्थ बनवणे, निकृष्ट दर्जाचे पॅकेजिंग आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन अशा प्रकारांवर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

याशिवाय शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कठोर नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनातही तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची चर्चा रंगली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी काही ड्रग माफियांनी मोठी रक्कम जमा केल्याचा आरोप केला. मात्र, याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया मुंढे यांनी दिली.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

Next Post

इचलकरंजी राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस जुने दानवाड ग्रामस्थांचा एकमुखी विरोध

Related Posts

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
26
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
13
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
13
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
5
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
5
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
43
Next Post

इचलकरंजी राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस जुने दानवाड ग्रामस्थांचा एकमुखी विरोध

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In