• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इचलकरंजी राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस जुने दानवाड ग्रामस्थांचा एकमुखी विरोध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 25, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

कुरुंदवाड : इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस जुने दानवाड येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून, या योजनेविरोधात विशेष ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

जुने दानवाड येथील कृष्णा-दुधगंगा नद्यांच्या संगमावरून इचलकरंजी शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबवण्याचे नियोजन शासकीय स्तरावर सुरू आहे. मात्र, परिसरातील नागरिकांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने या योजनेमुळे स्थानिक भागाचा मोठा तोटा होईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार आयोजित विशेष ग्रामसभेत ग्रामसेवक सौ. सारिका मोटे, सरपंच राजश्री तासगावे, पोलीस पाटील स्वाती कुन्नरे तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नितीन बागे, वर्धमान तिप्पन्नावर, शिवराज तासगावे आणि खंडेराव चव्हाण यांनी सभेला मार्गदर्शन करत आपली मते मांडली. ग्रामस्थांनी सांगितले की, राजापूर बंधाऱ्याजवळ महाराष्ट्राच्या पाण्याची हद्द संपते. उन्हाळ्यात दुधगंगा नदी कोरडी पडते, तर परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले की, काळमवाडी धरणासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्या, त्याग सहन केला; मात्र आजही गावाला पुरेसे पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत इचलकरंजी शहरासाठी पाणी देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, पूर्वीही इचलकरंजी शहराला कुरुंदवाडमार्गे पाणीपुरवठा करण्यात आला होता. पुन्हा शिरोळ तालुक्यातून पाणी घेण्याचा प्रयत्न अन्यायकारक असल्याचा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

इचलकरंजी शहरातून पंचगंगा नदीत सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्याला अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत असल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले. “आमच्या हक्काचे पाणी कोणालाही देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेत ग्रामसभेत राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस विरोधाचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.

यावेळी कुमार पाटील, बाळगोंड पाटील गुरुजी, सुरेश शिदनाळे, आप्पासो वडगावे, नितीन पाटील, सुरज वडगावे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Previous Post

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

Next Post

खिद्रापूरकरांचा २७ जूनपासून गावबंद आंदोलनाचा इशारा

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
0
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
2
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
16
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
8
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
4
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

खिद्रापूरकरांचा २७ जूनपासून गावबंद आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In