• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कजगावजवळ भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक; एका भाविकाचा मृत्यू, अनेक जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

भडगाव प्रतिनिधी

कजगाव जवळ सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. धार्मिक दिंडीसोबत असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर आणि तेरा भाविक किरकोळ जखमी झाले आहेत.

RelatedPosts

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

मिळालेल्या माहितीनुसार, महिंदळे गावातून धार्मिक पायी दिंडी मार्गस्थ झाली होती. दिंडीसोबत काही भाविक ट्रॅक्टरमधून प्रवास करत होते. दरम्यान, कजगावजवळ महामार्गावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या इंडियन गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचा मागील भाग अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात एका भाविकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर तेरा भाविक किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रॅक्टर आणि ट्रक रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, ट्रक चालकाची चौकशी सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे महिंदळे गावासह संपूर्ण भडगाव तालुक्यात शोककळा पसरली असून मृत भाविकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Ad 1
Tags: Vilas Patil
Previous Post

मोर्शी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक नंदाताई सावरकर यांचा निरोप समारंभ संपन्न

Next Post

प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवडे येथे आढावा बैठक संपन्न

Related Posts

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान
ताज्या घडामोडी

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान

November 17, 2026
0
कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल
ताज्या घडामोडी

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

November 17, 2026
41
मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा
ताज्या घडामोडी

मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

November 17, 2026
11
कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’
ताज्या घडामोडी

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

November 16, 2026
7
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी
ताज्या घडामोडी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

November 16, 2026
4
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय
ताज्या घडामोडी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

November 16, 2026
32
Next Post

प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवडे येथे आढावा बैठक संपन्न

ताज्या बातम्या

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान

November 17, 2026
कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

November 17, 2026
महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

November 17, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In