भोर प्रतिनिधी
प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवडे येथे मंगळवार, दि. ३० रोजी आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत स्वरूपाताई संग्राम थोपटे यांनी परिसरातील नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा तसेच आरोग्य केंद्रातील विविध बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी सुषमाताई चव्हाण, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य राजीव केळकर, सोपान तांगडे आदी उपस्थित होते.
बैठकीत आरोग्य केंद्रासमोरील अडचणी, वैद्यकीय सुविधांची उपलब्धता तसेच सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे ही आपली प्राथमिकता असून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली.
या बैठकीला आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जनसेवेच्या कार्यात आरोग्य विभागाचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
