• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोद्री शिवारात हिंस्र प्राण्याचा धुमाकूळ; १४ शेळ्यांचा फडशा, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 1, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई प्रतिनिधी :

अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री गावातील शिवारात एका अज्ञात हिंस्र प्राण्याने धुमाकूळ घालत लोखंडी शेडमध्ये घुसून तब्बल १४ शेळ्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

कोद्री शिवारातील शेतकरी आबासाहेब पोटभरे यांच्या शेतातील शेडमध्ये हा प्रकार घडला. एकाच रात्रीत झालेल्या या हल्ल्यात १४ शेळ्यांचा मृत्यू झाला असून त्यामुळे पोटभरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन हिरावल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, संबंधित विभागाचे कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून मृत शेळ्यांचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) केले असून पोलिसांकडून पंचनामा देखील करण्यात आला आहे.

या हल्ल्यामागे नेमका कोणता हिंस्र प्राणी आहे, याचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार बिबट्या, लांडगा किंवा इतर कोणत्यातरी हिंस्र पशूचा वावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिकृत पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी शासनाकडे आबासाहेब पोटभरे यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच परिसरातील हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी शेतात किंवा एकांत भागात जाताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने प्रशासनाला माहिती देण्यास सांगितले आहे.

Previous Post

सेवानिवृत्तीनिमित्त सरोदे सरांचा भावपूर्ण सन्मान; उमेश मुर्रेकर यांच्या हस्ते सत्कार

Next Post

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी व डेटा सायन्स अभ्यासक्रमांना शासन मान्यता

Related Posts

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
Blog

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
4
कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
Blog

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
12
सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव
Blog

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

August 15, 2026
39
एरंडोल नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिर!
Blog

एरंडोल नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिर!

August 15, 2026
5
केळशीकरांच्या आंदोलनाचा दबाव; जलजीवन योजनेला ऑक्टोबरची ‘डेडलाईन’! काम पूर्ण न झाल्यास २६ जानेवारीला आमरण उपोषणलेखी आश्वासनानंतर १५ ऑगस्टचे उपोषण स्थगित; ग्रामस्थांची भूमिका मात्र कायम

68
Blog

रिसोडमध्ये ‘हर घर तिरंगा’ रॅलीला प्रतिसाद

August 15, 2026
6
Next Post

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी व डेटा सायन्स अभ्यासक्रमांना शासन मान्यता

ताज्या बातम्या

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

August 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In