• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्येष्ठ नागरिक साहेबराव देवराव सोळंके यांचे दुःखद निधन; मानवत शहरात हळहळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

Manwath | प्रतिनिधी :

मानवत येथील ज्येष्ठ नागरिक तथा सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व साहेबराव देवराव सोळंके यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मानवत शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

साहेबराव सोळंके यांचे वय ९२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रामराव सोळंके यांचे ते वडील होत.

साहेबराव सोळंके हे शांत, मनमिळावू, कष्टाळू आणि सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अथक परिश्रम करून आपल्या मुलांचे संगोपन केले आणि त्यांना सक्षम बनविले. त्यांनी आयुष्यभर पेपर विक्रीचा व्यवसाय प्रामाणिकपणे केला. अनेक वर्षे घरोघरी जाऊन वृत्तपत्र वितरण करत त्यांनी समाजाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते.

त्यांच्या साध्या, प्रेमळ आणि मदतीच्या स्वभावामुळे समाजात त्यांना विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते. त्यांच्या निधनाने सोळंके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मानवत शहराने एक ज्येष्ठ, कर्तव्यनिष्ठ आणि आदरणीय व्यक्ती गमावली आहे.

त्यांच्या पार्थिवावर दि. १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मानवत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साहेबराव देवराव सोळंके यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि सोळंके परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

परभणीत भीषण अपघात; मानवतजवळील कोल्हा शिवारात अर्टिगा कार उड्डाणपुलाला धडकून दोन युवकांचा मृत्यू

Next Post

कन्नडच्या व्यावसायिकांना अन्न, औषध प्रशासन व वैध मापन विभागाचे मार्गदर्शन

Related Posts

ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
23
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
70
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
59
Next Post

कन्नडच्या व्यावसायिकांना अन्न, औषध प्रशासन व वैध मापन विभागाचे मार्गदर्शन

ताज्या बातम्या

रस्त्यासाठी सुरू केलेले उपोषण लिखित आश्वासनानंतर मागे

रस्त्यासाठी सुरू केलेले उपोषण लिखित आश्वासनानंतर मागे

August 16, 2026
कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In