• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्रचे संघटक तथा दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर यांना ‘शब्दवेध गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
53
VIEWS
Ad 1

मुंबई | प्रतिनिधी

पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड, निष्पक्ष आणि समाजहिताची भूमिका जपत उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र विभागाचे संघटक तथा दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब रज्जाक मुजावर यांना आर्यारवी एंटरटेनमेंटतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘शब्दवेध गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

सिने-नाट्य अभिनेते, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर तेटांबे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या पहिला पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य व समाजसेवक पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता दादर (पूर्व), मुंबई येथील सुरेंद्र गावस्कर हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

मिर्झागालिब मुजावर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्याचे काम केले आहे. सत्य, न्याय आणि जनहितासाठी त्यांनी सातत्याने निर्भीड भूमिका घेत पत्रकारितेचा सामाजिक धर्म जपला आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या प्रामाणिक, निष्ठावान आणि प्रभावी कामगिरीमुळे त्यांना वेळोवेळी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न तसेच पत्रकार बांधवांमध्ये संघटनात्मक एकता निर्माण करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्यात आले असून, पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

दैनिक तुफान क्रांतीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने प्रकाश टाकत त्यांनी लोकजागृतीचे कार्य केले आहे. त्यांची निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारिता नव्या पिढीतील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

‘शब्दवेध गौरव पुरस्कार २०२६’ हा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव असून, भविष्यातही ते पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि समाजहितासाठी अधिक जोमाने कार्यरत राहतील, असा विश्वास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

“सत्यासाठी निडरपणे लढणारी लेखणी आणि समाजहितासाठी अखंड झटणारी वृत्ती हीच खऱ्या पत्रकाराची ओळख असते. मिर्झागालिब मुजावर यांनी आपल्या कार्यातून ही ओळख अधिक दृढ केली आहे. त्यांचा हा सन्मान संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा शब्दांत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Tags: Dattatray Yadav
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अंबाजोगाईत मोठा धक्का!

Next Post

आर्वी पोलिसांतर्गत टाकरखेडा येथे ‘संवाद उपक्रम’ संपन्न; पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी साधला जनतेशी थेट संवाद

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
60
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
75
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

आर्वी पोलिसांतर्गत टाकरखेडा येथे ‘संवाद उपक्रम’ संपन्न; पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी साधला जनतेशी थेट संवाद

ताज्या बातम्या

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

August 16, 2026
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In