• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आर्वी पोलिसांतर्गत टाकरखेडा येथे ‘संवाद उपक्रम’ संपन्न; पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी साधला जनतेशी थेट संवाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | वर्धा

पोलीस प्रशासन आणि जनता यांच्यात थेट समन्वय वाढवून नागरिकांच्या अडीअडचणी जागेवरच सोडवण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी मौजा टाकरखेडा (ता. आर्वी) येथील संत लाहनुजी महाराज संस्थान येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल प्रमुख उपस्थित होते.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

दुपारी १२ ते २ या वेळेत पार पडलेल्या या बैठकीत पोलीस विभागासह महसूल, पंचायत समिती, आरोग्य, कृषी, विद्युत, वन विभाग तसेच इतर शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध विभागांशी संबंधित समस्या आणि तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली.

यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या संवादात टाकरखेडा व परिसरातील सुमारे ३०० ते ४०० नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी सहभाग घेत गावातील प्रमुख समस्या मांडल्या. गावात पोलीस चौकी सुरू करणे, आर्वी-टाकरखेडा मुख्य रस्त्याची दुरुस्ती करणे, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करणे तसेच बिबट्याच्या वाढत्या त्रासावर उपाययोजना करणे या प्रमुख मागण्या नागरिकांनी मांडल्या.

यावेळी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील आठ दिवसांत वीज समस्येचे निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच खराब रस्त्याचे कामही आठ दिवसांत सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले.

पोलीस अधीक्षकांनी स्थानिक ठाणेदारांना अवैध धंदे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत किंवा संशयास्पद हालचालींबाबत नागरिकांनी गोपनीय माहिती थेट पोलीस प्रशासनाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुन्हेगारी नियंत्रण आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस व नागरिकांमधील समन्वय अधिक मजबूत होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या या ‘संवाद’ उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, यापूर्वीही जिल्ह्यात २५० हून अधिक संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ, संत लाहनुजी महाराज संस्थानचे सचिव सतिष ठाकरे, तहसीलदार हरिश काळे, आर्वी वन परिक्षेत्र अधिकारी, आर्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे टाकरखेडा परिसरात पोलीस प्रशासन आणि शासनाविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Tags: Shankar Panbude
Previous Post

पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्रचे संघटक तथा दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर यांना ‘शब्दवेध गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर

Next Post

वर्धा जिल्हा पोलीस दलातील ६ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
60
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
75
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

वर्धा जिल्हा पोलीस दलातील ६ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न

ताज्या बातम्या

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

August 16, 2026
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In