• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कृषी दिनानिमित्त शहाद्यात ‘खेती बचाव अभियान’ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात १ जुलै रोजी कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी दिनानिमित्त तालुक्यातील सात गावांमध्ये ‘खेती बचाव अभियान’ राबविण्यात आले.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.

कृषी दिनानिमित्त महाविद्यालयातर्फे परिसरातील शेतकऱ्यांसाठी ‘खेती बचाव अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शहादा तालुक्यातील तिखोरा, मोहिदा त. ह., अलखेड, चिखली, कानडी, पाडळदा आणि म्हसावद या गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.

या मेळाव्यांमध्ये विषय विशेषज्ञ प्राध्यापक तसेच ‘रावे’ (RAWE) अंतर्गत कार्यरत कृषी दूत व कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मातीचे महत्त्व, माती तपासणी, जमिनीची सुपीकता सुधारणा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.

विविध गावांतील मार्गदर्शन

  • तिखोरा येथील त्रिंबकेश्वर महादेव मंदिरात प्रा. अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
  • अलखेड येथील श्रीराम मंदिरात प्रा. कृणाल पाटील यांनी माहिती दिली.
  • चिखली व कानडी येथील समाजगृहात डॉ. सचिन चौधरी यांनी संवाद साधला.
  • पाडळदा येथील मुरली मनोहर मंदिरात प्रा. विलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.
  • मोहिदा त. ह. येथील श्रीकृष्ण मंदिरात प्रा. विजय सपकाळ यांनी तांत्रिक माहिती दिली.
  • म्हसावद येथील धनगर मढी परिसरात डॉ. भरत चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

मेळाव्यांदरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी अवजारे आणि सुधारित पीक पद्धतींची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूर पाटील तसेच प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

उमरी ठाण्यातील ‘व्हायरल’ दोन पोलीस कर्मचारी निलंबित

Next Post

शहाद्यात झाडांच्या वाढलेल्या फांद्या वाहतुकीस अडथळा; तातडीने छाटणीची मागणी

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
56
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
75
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

शहाद्यात झाडांच्या वाढलेल्या फांद्या वाहतुकीस अडथळा; तातडीने छाटणीची मागणी

ताज्या बातम्या

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

August 16, 2026
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In